वाघोली ड्रॅन्क अन्ड ड्राइव्ह प्रकरणी आरोपीस तीन दिवस कैद वीस हजाराचा दंड




पुणे (प्रतिनिधी) ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या प्रकरणात वाघोली वाहतूक विभागाच्या कारवाईनंतर आरोपीस शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिनांक १ जून २०२५ रोजी झालेल्या कारवाईतील गुन्हा क्रमांक २२/२०२५ नुसार, आरोपी चित्तरंजन प्रकाश बेवरा (वय २७, रा. आव्हाळवाडी फाटा, वाघोली, पुणे) याच्यावर मोटार वाहन कायदा कलम १८४, १८५ व ३(१)१८१ अन्वये खटला दाखल करण्यात आला होता.


दिनांक ११ जून २०२५ रोजी शिवाजीनगर येथील मा. मोटार वाहन न्यायालयात न्यायाधीश बिराजदार सो. यांनी सुनावणी दरम्यान आरोपीस ३ दिवसांची साधी कैद व २०,००० रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर आरोपीस येरवडा कारागृहात रात्री १० वाजता शिक्षा भोगण्यासाठी दाखल करण्यात आले.


ही कारवाई वाघोली वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Post a Comment

0 Comments