जेष्ठ पत्रकार सैफन शेख हल्ला प्रकरणी डिजिटल पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन.



सोलापूर (प्रतिनिधी ) एम डी 24 न्यूज चॅनल चे संपादक तथा जेष्ठ पत्रकार सैफन शेख यांच्यावर गुरुवार दिनांक 27/6/2024 रोजी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल परिसरात हल्ला करण्यात आला 


सैपन शेख यांनी डिजिटल न्यूज वेब पोर्टल एमडी न्यूज-२४ मध्ये गेल्या महिनाभरापासून पंचनामा या मथळ्याखाली सोलापूर शहर आणि जिल्हा आरोग्य प्रशासनाचा गैरकारभार उघडकीस आणला आहे. सोलापूर शहर आरोग्य अधिकारीपदी डॉ. राखी माने यांची प्रतिनियुक्ती नगरविकास मंत्रालयाने बेकायदेशीरपणे केली आहे. शहर आरोग्य अधिकारी पदी नियुक्ती किंवा प्रति नियुक्ती करताना, राज्य शासनाला किंवा महानगरपालिकेला वैद्यकीय क्षेत्रातील MBBS-DPH, MBBS-PSM असे शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांची आवश्यकता असते. तरी देखील ही नियमावली डावलून नगरविकास मंत्रालयाने राखी माने (MBBS- ENT) डॉक्टरांची प्रतिनियुक्ती केली आहे. याबाबत एमडी न्यूज मार्फत ही बाब सोलापूरकरांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. सोलापूर करांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी बातम्या प्रसारित केल्या होत्या.त्या बातमी राग मनात धरून श्रीकांत गायकवाड या इसमाने सिव्हिल हॉस्पिटल परिसरात जेष्ठ पत्रकार सैफन शेख यांना लाथाबुक्याने मारहाण केली आहे या घटनेचा निषेध व्यक्त करून जेष्ठ पत्रकार सैफन शेख यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी म्हणून डिजिटल पत्रकार संघाच्या सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे 

  यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार संघ अध्यक्ष जमीर भाई शेख . यशवंत पवार. इरफान शेख . उजेब इनामदार.शहानवाज शेख. आकीब मडकी . सादिक शेख. अल्ताफ शेख. अजमेर शेख. मोसिन बागवान. अर्जुन चौहान. समीर आबदीराजे. अशफाक शेख. बाबा शेख. परदीप चौहान आदि पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments