वृद्ध महिलेसह सुनेचा विनयभंग, माहिती अधिकार कार्यकर्ता अटकेत



सोलापूर : वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिच्यासह सुनेसह विनयभंग केल्याप्रकरणी व माहिती अधिकाराचा दुरूपयोग करणाऱ्या दोघांविरुद्ध मंद्रूप राची पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. प्रकाश संगप्पा वाघमारे (रा. मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर) आणि सिद्धराम धुडाप्पा बगले (रा. माळकवठा) अशी त्यांची नावे आहेत. वाघमारेला पोलिसांनी अटक केली असून तो न्यायालयीन कोठडीत असून बगले फरार आहे.

२५ जून रोजी दीराच्या मुलाचे मयत झाल्याने फिर्यादीचे पती गावात तर मुले कामानिमित्त बाहेरगावी गेली होती. सायंकाळी सहाच्या सुमारास दुचाकीवरून आलेला एकजणवृद्ध महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसला. मी प्रकाश वाघमारे माहिती अधिकार संघटनेचा कार्यकर्ता असून तुमच्या मुलाने जिल्हा परिषद शाळेच्या कामासाठी आणलेल्या खिडक्या,

दरवाजा, फरशा असे साहित्य घरात ठेवले असून त्याचा वापर स्वतःच्या घराच्या बांधकामासाठी करणार असल्याची माहिती सिद्धाराम बगले यांनी सांगितली आहे. साहित्य घरात कोठे आहे, सांगा नाहीतर आम्ही दोघे मिळून तुमच्या विरोधात माहिती अधिकार टाकू, असे म्हणून वृद्ध महिलेच्या हाताला धरून ओढाओढी केली. त्यावेळी त्यांच्या ओरडण्याचा आवाज सुना घराबाहेर आल्या व त्यांनी सोडवासोडवी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी 'तू मला खूप आवडली होती' असे तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांचा आवाज ऐकून तेथे आलेल्या शेजाऱ्यांनी सोडवासोडवी केली. त्यावेळी 'तुम्ही आमच्यात पडू नका, नाहीतर मी तुमच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करीन' अशी धमकी वाघमारे याने दिल्याचेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments