ब्रिलियंट टाइम्सचे इम्तियाज अक्कलकोटकर यांना पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर.



सोलापूर (प्रतिनिधी ) गेल्या आठ वर्षापासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र वतीने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात वेगवेगळे स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना आरोग्य योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांबाबत स्वतंत्र सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता राज्यातील वृत्तपत्राच्या ज्येष्ठ संपादकांना दरमहा 20 हजार रुपये पेन्शन यासह राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाणबाबत पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीनां पत्रकार सुरक्षा समिती वतीने त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून दरवर्षी विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन सत्कार केला जातोय पत्रकार सुरक्षा समिती चा राज्यस्तरीय पुरस्कार 2025 चा आदर्श पत्रकार म्हणून ब्रिलीयंट टाईम्स चे जेष्ठ पत्रकार इम्तियाज अक्कलकोटकर यांना जाहीर केल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे व सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी(बी एस), यांनी माहिती दिली आहे. ब्रिलियंट टाइम्सचे इम्तियाज अक्कलकोटकर पत्रकारिता करत करत सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत नेहमीच धावून जातात संजय गांधी निराधार योजना जाती दाखला उत्पन्न दाखला रहिवासी दाखला रेशन कार्ड यासह विविध शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोवण्या चे ते काम करत असून पत्रकारितेबरोबर एक सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे बिलियन टाईम्सचे इम्तियाज अक्कलकोट कर यांच्या कामाची दखल घेऊन पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार जाहीर केला असून ज्येष्ठ पत्रकार इम्तियाज अक्कलकोटकर यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याने पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सच्चा व प्रामाणिक पत्रकाराला आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याने पत्रकारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

0 Comments