मोहोळ (अमर पवार )
येथील भीमा नदी काठच्या भागातील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीच्या केबल वायर चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. मध्य रात्रीच्या आसपास चोरांनी हा प्रकार केला आहे. एकाचवेळी आठ ते दहा शेतकऱ्यांची
केबल वायर चोरून नेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे एक लाखाचे नुकसान झाले आहे.
केबलमधून तांब्याची तार मिळत असल्यामुळे केबलची चोरी होत आहे. हा प्रकार नवा नसून या भागामध्ये नेहमी हे चोरटे चोरी करतात. वायर चोरणे हे एका दोघांचे काम नसून एखादी टोळी सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. पोलीस प्रशासनासमोर या चोरांना पकडणे आव्हान आहे
आशा चोरीच्या प्रकारामुळे शेतकरी देशोधडीला लागले आहेत. विद्युत प्रवाह चालू असतानाही सहजपणे केबल वायर चोरून नेतात. ही टोळी सराईत असल्याचे बोलले जात आहे. अप्पा पवार, सदाशिव कावळे, अशोक पाटील, शिवाजी सरबळे, उत्तम पाटील आदी शेतकऱ्यांच्या केबल वायर चोरीला गेल्याची माहिती कामती पोलीस स्टेशन येथे दिली आहे.
0 Comments