Type Here to Get Search Results !

पत्रकार सुरक्षा समिती मोहोळ तालुका नूतन पदाधिकाऱ्यांचा बेगमपूर येथे सत्कार.



सोलापूर (प्रतिनिधी ) गेल्या आठ वर्षापासून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना  राज्यातील पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना  आरोग्य योजना यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणेशासकीय जाहिराती  राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी  खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत चौकशी राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण त्याचबरोबर पत्रकारांच्या इतर विषयावर पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आंदोलन उपोषण निवेदन  व राज्य सरकारकडे पत्रकार करून  पत्रकारांचे प्रश्न सोडवणाऱ्या  पत्रकार सुरक्षा समिती मोहोळ नूतन तालुका  पदाधिकाऱ्यांचा बेगमपूर येथे  सत्कार 



 करण्यात आला  या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून  पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार  कार्यकारी प्रदेशाध्यक्ष  रामचंद्र सरवदे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष तानाजी माने  दैनिक तुफान क्रांती चे संपादक मिर्झा गालिब मुजावर पंढरपूरचे जेष्ठ पत्रकार रवींद्र शेवडे बेगमपूर चे सरपंच सोमनाथ कसबे  उपसरपंच केशव काकडे (बापू ) पांडुरंग सरवळे  यांच्या उपस्थितीत  पत्रकार सुरक्षा समिती नूतन पदाधिकाऱ्यांचा  सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन  करून करण्यात आली 

 पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार जिल्हा सरचिटणीस बंडू तोडकर  मोहोळ तालुका अध्यक्ष सागर पवार तालुका कार्याध्यक्ष महादेव शेवाळे तालुका प्रसिद्धीप्रमुख  वजीर मुलाणी तालुका सचिव शहाजी शिंदे तालुका उपाध्यक्ष शुक्राचार्य शेंडेकर तालुका समन्वयक सारंग गुंड सदस्य अतुल भोई सुरज जगताप  यांचा ओळखपत्र नियुक्तीपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या 



यावेळी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद प्रमोद भैस माळशिरस तालुका अध्यक्ष सुजित सातपुते पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू सरचिटणीस अरुण सिडगिद्दी लक्ष्मण सुरवसे अंबादास गज्जम किरण भिसे मनोज ननवरे इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.