महारेशीम अभियान सुरू जिल्हा रेशीम विकास अधिकारी विनीत पवार. जिल्ह्यातील १ हजार २६० एकरांवर उद्योग चालू




सोलापूर (अमर पवार )

जिल्ह्यात रेशीम शेती उद्योगासाठी खूप वाव आहे. रेशीम शेतीचे महत्व व त्यातून मिळणाऱ्या शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी याकरीता जिल्ह्यात महारेशीम अभियान-२०२५ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात रेशीम उद्योग वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन जिल्हा रेशीम विकास अधिकारी विनीत पवार यांनी केले. जिल्ह्यातील ११ तालुक्यांत १ हजार १७ शेतकऱ्यांचा १ हजार २६० एकरावर हा उद्योग चालू असून, दि. ९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे.


जिल्ह्यासाठी नव्याने ५०० एकर तुती लागवडीची लक्षांक दिलेला आहे. कृषी विभाग, जिल्हा परिषद व इतर यंत्रणांच्या समन्वयाने ११ तालुक्यांमध्ये सुमारे २ हजार नवीन शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाकडे वळविण्यासंबंधी जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात तुती लागवडीद्वारे रेशीम कोष उत्पादन योजना महात्मा | गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार


हमी योजना राबविण्यात येत आहे. यात लाभार्थी निवडताना, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जमाती, दारिद्रय रेषेखालील कुटुंबे, महिला प्रधान कुटुंबे, शारीरिक अपंगत्व प्रधान कुटुंबे, भुसुधार योजनेचे लाभार्थी, कृषी कर्ज माफी योजनेनुसार अल्पभूधारक सिमांत शेतकऱ्यांना निवडण्यात येणार आहे. रेशीम विकास प्रकल्पासाठी ३ वर्षाच्या कालावधीत अकुशल व कुशल मजुरी देण्यात येते. यात तुती लागवड व जोपासनेसाठी ६८२ दिवस व कीटक संगोपन गृहासाठी २१३ दिवस असे ८९५ दिवसांची देण्यात येते. सध्या प्रती एकर ३ वर्षाकरीता एकूण ४ लाख १८ हजार ८१५ रुपये इतके अनुदान देण्यात येते. सिल्क समग्र - २ या योजनेंतर्गत एक एकर नवीन तुती लागवडीसाठी सर्वसाधारण गटाकरीता ३ लाख ७५ हजार रुपये अनुदान व अनुसूचित जाती, जमाती करीता ४ लाख ५० हजार अनुदान देण्यात येते. इच्छुक लाभार्थ्याकडे मध्यम ते भारी व पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. सिंचनाची पुरेशी सोय हवी एकरी वार्षिक सर्व खर्च वजा जाता किमान १ लाख ५० हजार रुपये उत्पन्न निश्चित मिळते.

Post a Comment

0 Comments