सोलापूर -लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकी करिता ७ मे ला मतदान प्रक्रिया पूर्ण झाली यामध्ये सर्व साधारणपणे प्रत्येक बुथवर ५० ते ६० मतदारांची नावे डिलीट असा शेरा मारून
मतदारांचे नाव यादीतून वगळण्यात आल्याचे निदर्शनास आले. साधारणपणे ही सर्व नावे विशेष करून एका विशिष्ट समाजाची असल्याचे दिसून आले. यामध्ये निवडणूक आयोगाची अक्षम्य चुक
असल्याचे लक्षात येते. यासंदर्भात आपण मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार देणार असल्याचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी जवळजवळ ९० बुथवर भेटी देत असताना असे प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. यात आपल्याला एका मोठ्या षड्यंत्राचा वास येत आहे, वेळ पडल्यास आपण उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments