जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बजावला मतदानाचा हक्क



सोलापूर :- जिल्हाधिकारी तथा ४२- सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर शहरातील सिद्धेश्वर प्रशाला येथील मतदान केंद्रावर आपले मतदान करून मतदानाचा हक्क बजावला.

       येथील सिद्धेश्वर प्रशालेच्या मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे साधारणतः चार वाजता मतदानासाठी गेले. 

त्या मतदान केंद्रावरील मतदाराच्या रांगेमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उभा राहिले.

 परंतु या मतदार केंद्राच्या रांगेतील सर्व मतदारांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना आपण अगोदर मतदान करण्याची विनंती केली.

 प्रथमत: जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी तसे करण्यास नकार दिला,

 परंतु मतदारांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Post a Comment

0 Comments