संगीत क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे.
संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदानाबद्दल सुरेश वाडकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज ही घोषणा केली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराची रक्कम पूर्वी पाच लाख रुपये होती. ही रक्कम यापुढे दहा लाख रुपये होईल, अशी घोषणा सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्राrय संगीत जीवन गौरव पुरस्कार 2022 साठी पं. उल्हासजी कशाळकर यांचे नाव घोषित झाले असून, 2023 च्या पुरस्कारासाठी पं. शशिकांतजी (नाना) श्रीधर मुळ्ये यांची घोषणा करण्यात आली आहे.
नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार 2022 साठी सुहासिनी देशपांडे यांच्या नावाची घोषणा झाली आहे, तर 2023 साठी अशोकजी समेळ यांना पुरस्कार घोषित झाला आहे.
0 Comments