प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवा : औसेकर महाराज



वीरशैव व्हिजनतर्फे 50 विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट 

सोलापूर :   प्रतिनिधी  परिस्थिती अनुकूल किंवा प्रतिकूल असणे हे व्यक्तीच्या हातात नसते. आपल्यामध्ये योग्य ते बदल करून व्यक्ती आपली परीस्थिती बदलू शकते. सातत्य, जिद्द व परिश्रम यांच्या आधारे प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवा असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले.

              वीरशैव व्हिजन युवक आघाडीतर्फे कामगार पाल्यांना शैक्षणिक किट वितरणप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर श्री नाथ संस्थान औसाचे श्रीरंग महाराज औसेकर, श्री बृहन्मठ होटगीचे संचालक शिवानंद पाटील, उद्योगपती गोविंदराव माकणे, उद्योजक रवी रापेल्ली, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे उपस्थित होते.

          एमआयडीसी येथील विनायक नगर येथील सारथी युथ फाऊंडेशनच्या बालसंस्कार वर्गातील वीटभट्टी, यंत्रमाग व विडी कामगार पाल्यांना शैक्षणिक साहित्याची अनुपलब्धता असल्याचे रामचंद्र वाघमारे यांनी वीरशैव व्हिजनच्या निदर्शनास आणून दिले. याची दखल घेऊन वीरशैव व्हीजन युवक आघाडीच्या वतीने या 50 कामगार पाल्यांना शैक्षणिक किट देण्यात आले. या शैक्षणिक किटमध्ये शालेय बॅग, 6 वही, कंपासपेटी, रंगपेटी, चित्रकला वही आणि 5 पेनचा सेट असे वर्षभर पुरेल इतके साहित्य देण्यात आले.

         प्रसंगी कोषाध्यक्ष आनंद दुलंगे, सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, कार्याध्यक्ष शिवानंद सावळगी, राजेश नीला, सोमनाथ चौधरी, अमोल कोटगोंडे, सुयश कविटकर उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केले. सूत्रसंचालन राहुल बिराजदार यांनी केले तर आभार विजयकुमार बिराजदार यांनी मानले.

           कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सारथी युथ फाऊंडेशनचे रामचंद्र वाघमारे, हणमंत सलगर, तुकाराम चाबुकस्वार, भाग्यश्री चाबुकस्वार, बसवराज जमखंडी, विश्वनाथ चिक्कळी यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळी : वीरशैव व्हीजनतर्फे कामगार पाल्यांना शैक्षणिक किट देताना गहिनीनाथ महाराज औसेकर, श्रीरंग महाराज औसेकर, शिवानंद पाटील, गोविंदराव माकणे, रवी रापेल्ली, राजशेखर बुरकुले, चिदानंद मुस्तारे, आनंद दुलंगे, शिवानंद सावळगी, विजयकुमार बिराजदार, राजेश नीला

Post a Comment

0 Comments