एएसआय पवार यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या हस्ते सत्कार.



सोलापूर (प्रतिनिधी ) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला

राष्ट्रपती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली यामध्ये उल्लेखनीय सेवाकार्य केल्याबद्दल फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनीता पवार यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. त्यांचा वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या हस्ते पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.


सुनीता पवार या पोलिस शहर दलात १९९२ साली भरती झाल्या. त्यांच्या ३३ वर्षाच्या सेवेत शिपाई, नाईक, हवालदार नं. ते सहायक पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत झेप घेतली आहे. नोकरीबरोबर त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या एमएच्या प्रथम वर्षात शिकत आहेत. त्यांचे पती सैन्यातून व निवृत्त झाले आहेत. त्यांना दोन विवाहित मुली व एक मुलगा असा परिवार आहे

सोलापूर उल्लेखनीय सेवाकार्याबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल सहाय्यक फौजदार सुनीता पवार यांचा फौंजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक 

अरविंद माने यांच्या हस्ते पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments