सोलापूर (प्रतिनिधी ) वाढत्या लोकसंख्येमुळे सोलापूर शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून शहरातील लोकसंख्या जवळपास 16 लाख असून सोलापूर शहर हे उत्सव प्रिय शहर असून वर्षाचे बारा महिने वेगवेगळ्या स्वरूपाचे सण उत्सव साजरे होत असतात त्याचबरोबर मिरवणूका देखील मोठ्या प्रमाणात सोलापूर शहरातून निघतात तसेच राजकीय सभा मेळावे बैठका त्याचबरोबर मुख्यमंत्री व इतर मंत्री मंडळातील मंत्री महोदय नेहमीच सोलापूरला येत असतात या सर्व बाबींचा पोलीस प्रशासनावर प्रचंड ताण पडत असला तरी कायदा सुव्यवस्था राखण्यात सोलापूर चे पोलीस प्रशासन कुठेही कमी पडलेले नाही . यापूर्वी सोलापूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी त्याच बरोबर भांडण तंटे मारामाऱ्या रोखण्यासाठी व वेळीच पायबंध घालण्यासाठी सोलापूर शहरात जवळपास 23 पोलीस चौक्या उघडण्यात आल्या होत्या पण सध्या त्यातील बहुतेक चौक्या कुलूपबंदच आहेत पोलीस चौकी आपल्या भागात असल्याने नागरिक देखील आपली तक्रार फिर्याद नोंदविण्यासाठी पोलीस चौकीत जायचे. आता परिस्थिती बदलली असून सोलापूर शहर झपाट्याने वाढले असून जवळपास पोलीस चौकी नसल्याने नागरिकांना आपल्या तक्रारी फिर्याद व अडचणी बाबत पोलीस स्टेशनला जावं लागत आहे सोलापूर शहरात दोन गटात हाणामारी दगडफेक चोरी घरफोडी अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आहे नागरिकांना मदतीसाठी अनेकदा डायल 112 वर कॉल करावे लागत आहे नागरिकांची फिर्याद किंवा तक्रारी पोलीस स्टेशन याच ठिकाणी घेतल्या जात आहे त्यामुळे तक्रारी देण्यासाठी नागरिकांना आता पोलीस स्टेशन ला जाणे क्रमप्राप्त झाले आहे नागरी भागातील पोलीस चौक्या बंद असल्याने नागरिकांना आपल्या तक्रारी / फिर्याद नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशन ला जावं लागत असून नागरीवस्त्या नगरे पासून पोलीस स्टेशन चे अंतर खूप लांब असून अनेक नगर वस्त्यापासून पोलीस स्टेशन जाणे खूपच कठीण व जिकरीचे झाले असून नागरिकांना आपली तक्रार फिर्याद नोंदवण्यासाठी मोठी पायपीट व कसरत करावी लागत
आहे त्याचबरोबर वेळेत पोलिसांची मदत देखील मिळत नसल्याने नागरिकांना फार मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे तरी मा जिल्हाधिकारी यांनी सोलापूर शहरातल्या बंद केलेल्या पोलीस चौक्या पुन्हा नव्याने सुरू करण्या बाबत पोलीस महासंचालक यांच्याशी पत्रव्यवहार करून सोलापूर शहरातील नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार यांनी सोलापूर चे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे
0 Comments