Type Here to Get Search Results !

घरगुती शिंदी ने घेतला पेट यशवंत पवारांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार, सुस्तावलेल्या निरीक्षकांवर कारवाई करण्याची लावून धरली मागणी.




सोलापूर (प्रतिनिधी ) 

शहर लगत असलेल्या व कुंभारी भागात मोडत असलेल्या गोदुताई विडी घरकुल (नवीन विडी घरकुल) भागातील अ विभाग ब विभाग क विभाग या ठिकाणी सर्वसामान्य विडी कामगार आपली उपजीविका विडी तयार करून करत आहेत अतिशय सामान्य व गरीब कुटुंब या भागात आपली गुजरान करत असून आपले पोट भरत आहेत त्यांचे उत्पन्न देखील अतिशय अल्प असून हाताला मिळेल ते काम करून आपलं कुटुंब चालवत आहेत या भागात अनेक जाती धर्माचे लोक राहत असून सण उत्सव जयंती साजरी करतात तसेच आंनदाने एकमेकांच्या सणात सहभागी होतात.या भागात गेली अनेक वर्षांपासून घरगुती रासायनिक शिंदी विक्री होत असून या घरगुती शिंदी विक्री ला रोखण्यात राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना अपयश आले असून सुस्तावलेल्या निरीक्षकांचे अनेक बेकायदेशीर धंद्याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आता सर्वत्र रंगू लागली असून राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकांच्या कार्य पद्धतीवरचं प्रश्न चिन्ह निर्माण झाल्याने राज्य उत्पादन शुल्क चे निरीक्षक आता नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे


नवीन विडी घरकुल परिसरातील स्वस्तात मिळणाऱ्या घरगुती रासायनिक शिंदी ने अनेकांचा बळी जाण्याची शक्यता दाटअसून या भागात अनेक ठिकाणी रासायनिक (घरगुती) शिंदी अल्प दरात मिळत असून स्वस्त दरात रासायनिक शिंदी मिळत असल्याने कमी पैशात जास्त नशा होत असून गोरगरीब ही रासायनिक शिंदी पिण्यासाठी जातात या रासायनिक शिंदीमुळे काही जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत परंतु कागदोपत्री तशी नोंद केली जात नाही. या रासायनिक शिंदीमुळे अनेकांचा संसार धुळीस मिळाला आहे गेली अनेक वर्षांपासून नवीन विडी घरकुल भागात रासायनिक शिंदी विक्री होत असून या बेकायदेशीर रासायनिक शिंदी विक्री करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांच्याकडे साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार यांनी 


दिनांक 16/6/ 2025 रोजी लेखी स्वरूपाची तक्रार केली होती एक महिना उलटून गेला तरी राज्य उत्पादन शुल्क च्या निरीक्षकांनी अद्याप कोणतेही कारवाई केलेली नाही नवीन विडी घरकुल मधील रासायनिक घरगुती शिंदी विक्री करणाऱ्या त्याच बरोबर कारवाई करण्यास टाळटाळ करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क च्या निरीक्षकांवर कारवाई करण्यात यावी म्हणून साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार यांनी दिनांक 18/7/2025 रोजी सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून राज्य उत्पादन शुल्क च्या निरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली असून नवीन विडी घरकुल मधील घरगुती रासायनिक शिंदी ने पेट घेतला असून कारवाई न केल्यास यशवंत पवार यांनी उपोषणा चा इशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.