गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीने वारकरी साठी आरोग्य शिबीर.



 सोलापूर -संत गजानन महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांसाठी दमानी नगर येथे गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीने महाआरोग्य शिबिर राबविण्यात आले. शिबिरामध्ये डॉ शिवाजीराव पाटील, डॉ सुनील वायचळ, डॉ दीपक पोतदार, डॉ महेश पिंगळे, डॉ रोहित शेळवणे, डॉ महेश माने, डॉ मंगेश बिराजदार , डॉ गौतम रेवणकर, डॉ संतोष बोराडे, डॉ अस्मिता पोद्दार, डॉ लक्ष्मी पिंगळे, डॉ पूजा शेळवणे , डॉ प्राची महिंद्रकर, डॉ श्रद्धा पवार ,डॉ विशाखा साळवे या सर्व 15 डॉक्टरांनी वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी केली . शिबिराचे उद्घाटन मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते औदुंबर बुवा जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंडळाचे संस्थापक महादेव गवळी, हेमंत पिंगळे, शामराव गांगर्डे, चंद्रकांत पवार, लहू गायकवाड,संदीप काशी ,बाळासाहेब घुले, बजरंग जाधव, अरविंद गवळी ,सुनील कदम, शेखर कवठेकर उपस्थित होते. यावेळेस कु आकांक्षा मुळीक जर्मनी येथे फूड टेक्नॉलॉजीच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र शासनातर्फे निवड झाल्याबद्दल मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैभव जगताप, संतोष मोरे, विजय घुले, सरफराज शेख, सुदर्शन कवठेकर, प्रवीण साळुंखे, अशोक बनसोडे, बाळासाहेब गवळी इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments