सोलापूर (प्रतिनिधी ) चोरीची दुचाकी घेऊन पद्मशाली स्मशानभूमीजवळ आलेल्या एका २४ वर्षीय संशयितास जेलरोड पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीअंति त्याच्याकडून दीड लाख किमतीच्या चार दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सैफ इरफान यादगीर (वय २४, रा. नवीन विडी घरकुल, कुंभारी, ता. द. सोलापूर) असे त्याचे नाव आहे.
जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घडणाऱ्या
गुन्ह्यांबाबत प्रकर्षाने लक्ष केंद्रित करून दुचाकी चोरणाऱ्या आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी दिले होते. गुन्हे प्रकटीकरण पथकास दुचाकी चोरीचे गुन्हे उघड करण्यास सांगितले होते. पथकाने नेहमी चोऱ्या होतात अशी ठिकाणे शोधली. दुचाकी चोरीस गेलेल्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही तपासले.
फुटेज दरम्यान, चोरी केलेली दुचाकी घेऊन सैफ यादगीर हा अक्कलकोट रोडवरील पद्मशाली स्मशानभूमीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले. त्याची विचारपूस करताना तो गडबडून गेला व त्याच्या ताब्यातील वाहन तेथेच सोडून पळून जाऊ लागल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनवणे व त्यांच्या पथकाने त्याला पकडले. त्याच्या ताब्यातील दुचाकी (एमएच १३- बीए ०७६९) जप्त केली. त्याने जुने वालचंद कॉलेज येथील पार्किंगमधून ती चोरी केल्याचे सांगितले. त्याने आणखी दुचाकी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण चार दुचाकी हस्तगत केल्या आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त तोरडमल यांच्या मार्गदर्शनखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार (गुन्हे प्रकटीकरण ) पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे सहा फौंजदार कणगिरी सहा फौंजदार शेख शेख पोह /धुमाळ पो ना बाबर पो कॉ इंगळे पो कॉ सिनारे पो कॉ देकाणे पोकॉ वायदंडे पो कॉ सावंत पो शी जाधव पो कॉ यसलवाड यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
0 Comments