सोलापूर (प्रतिनिधी ) राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत शहरात पोषण पुनर्वसन केंद्र मंजूर करण्यात आले आहे. डफरीन चौकातील महापालिका प्रशासनाच्या राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृह आवारात कुपोषित माता व बालकांसाठी पोषण पुनर्वसन केंद्राचे (न्यूट्रिशन रिहॅबिलिटेशन सेंटर) जुलै अखेरपर्यंत काम पूर्ण करण्यात येणार आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाशेजारीच या प्रकल्पाचे काम सुरू हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरू आहेत.
पोषण पुनर्वसन केंद्र हे आरोग्य सुविधेतील एक युनिट आहे. तीव्र कुपोषण असलेल्या मुलांना दाखल केले जाते. याठिकाणी कुपोषित मुलांना व मातांना नियमानुसार निकषांची तपासणी करून प्रवेश दिला जातो. या पोषण पुनर्वसन केंद्रात त्यांना वैद्यकीय उपचारासह पौष्टिक आहाराची काळजी
घेतली जाणार आहे. माता व बालक यांना दहा दिवस या केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल. त्यांना या दहा दिवसांत वेळेवर पुरेसे आणि योग्य आहार देण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. दहा माता-बालकांसाठी या केंद्रात व्यवस्था सज्ज ठेवण्यात येणार आहे.
याबरोबरच महापालिकेच्या आठ प्रसूतिगृह व आरोग्य केंद्रे आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागामध्ये मनुष्यबळ कमी आहे. आरोग्य विभागाद्वारे शहरवासीयांना योग्य पद्धतीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देता याव्यात यासाठी डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तृतीय वर्ष उत्तीर्ण झालेल्या २० विद्यार्थ्यांची मागणी अधिष्ठातांकडे करण्यात आली आहे. या संदर्भात कार्यवाही झाल्यानंतर हे विद्यार्थी सेवेसाठी उपलब्ध होतील.
----------------------------------------------------------
शहरात सध्या आठ हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरु आहेत याशिवाय आणखी सहा आपला दवाखाना सुरु करण्यात येणार आहेत.
त्यासाठीची कार्यवाही सुरु आहे लवकरच शहरवासियांना याठिकाणी वैध्यकीय सेवा उपलब्ध होईल
डॉ राखी माने
आरोग्य अधिकारी सोलापूर महानगरपालिका.
0 Comments