रासायनिक ताडी विक्री रोखण्यात जोडभावी पोलिसांना अपयश भाग 1



सोलापूर -  शहरातील  भवानी पेठ तसेच  वस्ती मध्ये  रासायनिक ताडी विक्री होत असल्याची माहिती मिळत असून  जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वसामान्य  नागरिक तसेच विडी कामगार आपली उपजीविका विडी तयार करून करत आहेत अतिशय सामान्य व गरीब कुटुंब जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपली गुजरान मिळेल ते काम करून आपले पोट भरत आहेत त्यांचे उत्पन्न देखील अतिशय अल्प असून हाताला मिळेल ते काम करून आपलं कुटुंब चालवत आहेत या भागात अनेक जाती धर्माचे लोक राहत असून सण उत्सव जयंती साजरी करतात तसेच आंनदाने एकमेकांच्या सणात सहभागी होतात


स्वस्तात मिळणाऱ्या रासायनिक ताडी ने अनेकांचा बळी जाण्याची शक्यता दाट असून जोडभावी पेठ हद्दीत



 रासायनिक ताडी अल्प दरात मिळत असून  स्वस्त दरात रासायनिक ताडी मिळत असल्याने कमी पैशात जास्त नशा होत असून गोरगरीब नागरिक या भागात मिळणाऱ्या रासायनिक ताडी पिण्यासाठी जातात या रासायनिक ताडी पिण्यामुळे काही जणांना आपले प्राण गमवावे लागले  आहेत परंतु कागदोपत्री तशी नोंद केली जात नाही  या रासायनिक ताडीमुळे अनेकांचा संसार धुळीस मिळाला आहे

गेली अनेक वर्षांपासून  भवानी पेठ व अन्य 

भागात रासायनिक ताडी ची राजेरोसपणे विक्री होत असून या बेकायदेशीर रासायनिक ताडी विक्रीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन पुढे येत नसल्याचं सर्वसामान्य नागरिकांमधून बोललं जात आहे. तसंच या रासायनिक ताडी विक्री ला कोणाचा आशीर्वाद आहे? असा ही प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला असून अश्या जीवघेण्या रासायनिक ताडी विक्री रोखण्यासाठी आता पोलीस प्रशासन ची पुढाकार घ्यायला हवा अशी मागणी आता  नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

Post a Comment

0 Comments