पात्र रेशन कार्डधारकांची ई केवायसी मोहीम सुरु रेशनदुकानदार संघटनेचा पुढाकार



सोलापूर (प्रतिनिधी ) अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय, सोलापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसिन विक्रेता संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील चारही परिमंडळातील अन्नसुरक्षा व अंत्योदय योजनेतील पात्र रेशन कार्डधारकांची ई केवायसी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

शासनाने सर्व कार्डधारकांना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींचे रेशन दुकानात जाऊन ई केवायसी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कुटुंबातील सर्वांनी ई-केवायसी करणे अनिवार्य 




आहे. तसे न केलेल्या व्यक्तींचे धान्य बंद होऊ शकते. त्यामुळे सोलापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेने अध्यक्ष सुनील पेंटर यांच्या नेतृत्वाखाली पुढाकार घेऊन शनिवारी यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. उद्या (रविवारी) सुध्दा सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत ही मोहीम सुरू राहणार आहे. ई केवायसी करण्यासाठी येताना कार्डधारकांनी कुटुंबातील सर्व सदस्यांसह उपस्थित राहून सोबत सर्वांचे आधारकार्ड आणावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख नितीन पेंटर यांनी केले आहे




अ परिमंडळातील कार्डधारकांसाठी बाळीवेस बाळे, ब परिमंडळातील घोंगडे वस्ती, शेळगी, क परिमंडळातील दत्त नगर, अशोक चौक, नीलम नगर, नई जिंदगी व ड परिमंडळातील चाँदतारा मस्जिद, चांदणी चौक येथे ही मोहीम सुरू राहणार आहे.


शनिवारी या मोहिमेच्या शुभारंभावेळी परिमंडळ अधिकारी राजेश यमपुरे, दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर, जिल्हा संपर्क प्रमुख नितीन पेंटर, क विभागाचे अध्यक्ष जुवेर खानमियाँ, रेशन दुकानदार सागर शिंदे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments