सोलापूर (प्रतिनिधी ) जेष्ठ पत्रकार अरुण सिडगिद्दी हे गेल्या 20 ते 25 वर्षांपासून पत्रकारिता करत असून साप्ताहिक गोदूताई संदेश या वृत्तपत्राचे अभ्यासू संपादक म्हणून अनेक वर्षे काम पाहिले आहे जेष्ठ पत्रकार अरुण सिडगिद्दी यांनी अनेकांना पत्रकार होण्याची संधी दिली असून सोलापूर शहरातील अनेक पत्रकार अरुण सिडगिद्दी यांना पत्रकारांचे गुरु मानतात अरुण सिडगिद्दी यांचा राजकीय सामाजिक व इतर विषयांचा चांगला अभ्यास असून अनेक वर्षांपासून ते साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्रासाठी अतिशय निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन करत आहेत साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्र हे
गेली दहा वर्षांपासून राजकीय सामाजिक व शैक्षणिक बाबत च्या ताज्या घडामोडी तसेच समाजाचा आरसा म्हणून काम करत असून समाजातील वंचित पिढीत घटकाच्या साप्ताहिक कार्यसम्राट ने नेहमीच आवाज उठवला आहे आपल्या निरपेक्ष निर्भीड व सडेतोड बातमीने साप्ताहिक कार्यसम्राट ने आगळी वेगळी ओळख निर्माण केली असून जेष्ठ पत्रकार अरुण सिडगिद्दी यांची सोलापूर शहर प्रतिनिधी म्हणून फेर नियुक्ती केली असून त्यांना संपादक यशवंत पवार अमर पवार अनिल कोकाटे अतुल भडंगे कलीम शेख विनायक जालनापुरे बंडू तोडकर अंबादास गज्जम राजू वग्गू राजू पवार आन्सर तांबोळी मोहंमद शेख श्रीकृष्ण देशपांडे संतोष म्हेत्रे वैभव राऊत लक्ष्मण सुरवसे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments