सोलापूर - सोलापूर शहर पोलीस दलातील १९ पोलीस अंमलदारांच्या त्यांच्या विनंतीवरून वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहे.सोलापूर शहर यांच्या वतीने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस आयुक्त, सोलापूर शहर एम. राज कुमार यांनी हा आदेश पारित केला आहे.
एमआयडीसी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस शिपाई सुनील प्रकाश माने यांची बदली शहर वाहतूक शाखा उत्तर सोलापूर येथे बदली करण्यात आली आहे.विशेष शाखा सोलापूर शहर येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार रफिक मदारसो नदाफ यांची बदली शहर वाहतूक शाखा उत्तर सोलापूर येथे बदली झाली आहे.मोटार परिवहन विभाग सोलापूर शहर येथे कार्यरत पोलीस शिपाई विरसिंग रुपचंद लंबुवाले यांची बदली कार्यकारी दलात हर वाहतूक शाखा उत्तर सोलापूर येथे करण्यात आली आहे.पोलीस हवालदार सुरेश इरेश जमादार जोडभावी पेठ पोलीस येथून शहर वाहतूक शाखा दक्षिण सोलापूर येथून रद्द करून एमआयडीसी पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.सदर बझार पोलीस ठाणे येथील सहाय्यक फौजदार राजेश काशिनाथ जाधव यांची पोलीस मुख्यालय सोलापूर शहर येथे करण्यात आली आहे.जेलरोड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार गजानन शंकरराव कणगिरी यांची बदली शहर वाहतूक शाखा दक्षिण येथे करण्यात आली आहे.
सध्या नेमणुकीस जेलरोड पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई दुर्योधन संभाजी देशमुखे यांची बदली पोलीस मुख्यालय,सोलापूर शहर येथे करण्यात आली आहे.नियंत्रण कक्ष येथे नेमणुकीस असलेले महिला पोलीस हवालदार अन्नपूर्णा शिवाजी तिवारी याची बदली सायबर पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.महिला पोलीस शिपाई स्नेहा विनायकराव चिंचेकर एमआयडीसी (विमानतळ सुरक्षा) येथून सलगरवस्ती पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.दंगा नियंत्रण पथक येथे नियुक्तीस असलेले पोलीस शिपाई दिनेश दत्तात्रय मोरे यांची बदली फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे झाली आहे.पोलीस शिपाई विवेक दत्तात्रय नरळे सध्याची नियुक्ती पोलीस मुख्यालय येथून विशेष शाखा येथे करण्यात आली आहे.
