Type Here to Get Search Results !

सरदार वल्लभभाई पटेल जयंती व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती निमित्त सोलापूर तालुका पोलिसांतर्फे 'मिनी मॅरेथॉन' उत्साहात संपन्न. अकोलेकाठी ते वडाळा दरम्यान रंगली १० किमी स्पर्धा; मुलांच्या गटात आदेश चव्हाण तर मुलींमध्ये १३ वर्षांच्या रिया शिंदेची बाजी

 



सोलापूर (प्रतिनिधी ) सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून तसेच अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेअंतर्गत सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने आज, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी १० किलोमीटर मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. सोलापूर-बार्शी रोडवरील नागनाथ मंदिर (अकोलेकाठी कडे जाणारा रोड) ते वडाळा दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत तरुण-तरुणींनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या स्पर्धेमध्ये अकोलेकाठी व वडाळा येथील अकॅडमीमधील मुला-मुलींनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. कुंदन गावडे यांनी स्वतः या धावण्याच्या स्पर्धेत सहभाग नोंदवून खेळाडूंचा उत्साह द्विगुणित केला.

स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण:

 * मुलांचा गट:

   * प्रथम क्रमांक: आदेश चव्हाण (रुपये ५,०००/- व प्रमाणपत्र)

   * द्वितीय क्रमांक: पांडुरंग सूर्यवंशी (रुपये ३,०००/- व प्रमाणपत्र)

   * तृतीय क्रमांक: बाळासो पाटील (रुपये २,०००/- व प्रमाणपत्र)

 * मुलींचा गट:

   * प्रथम क्रमांक: रिया शिंदे (वय १३ वर्षे) (रुपये ५,०००/- व प्रमाणपत्र)

   * द्वितीय क्रमांक: रिया खलाटे (वय ९ वर्षे) (रुपये ३,०००/- व प्रमाणपत्र)

   * तृतीय क्रमांक: वृषाली बनसोडे (रुपये २,०००/- व प्रमाणपत्र)

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना पोलीस निरीक्षक श्री. कुंदन गावडे यांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

सदरची मिनी मॅरेथॉन स्पर्धा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी शसुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडली.

या प्रसंगी अकोलेकाठी व वडाळा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.