युवा पत्रकार आयाज हे सोलापूर येथील रहिवाशी असून लहानपणापासून त्यांना समाजसेवा बरोबर पत्रकारितेची आवड होती
पत्रकारिता एक ध्यास चळवळ व विचार समजून सोलापूर शहरातील वंचित पिढीत घटकांच्या विकासासाठी न्याय हक्कासाठी युवा पत्रकार अयाज शेख हे नेहमीच आपल्या लोकप्रिय दैनिक लोकप्रधान वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत
जिथं अन्याय तिथं त्यांची लेखणी पेटून उठायची समाजातील गोरगरीब अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या मदतीला अयाज शेख नेहमीच धावून जातात सरकारी दरबारात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात
सर्वसामान्य माणसांशी नाळ जोडणारा पत्रकार म्हणून आयाज शेख यांची सोलापूर शहरात आगळी वेगळी ओळख आहे समाजातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आजवर अनेक वेळा विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करण्याचा प्रामाणिक पणे प्रयत्न केला आहे.
*पत्रकारांच्या प्रश्नाची जाण*
युवा पत्रकार आयाज शेख हे पत्रकार सुरक्षा समितीचे मार्गदर्शक असून सोलापूर शहरातील पत्रकारांना एकत्र आणून पत्रकारांची त्यांनी चळवळ उभी केली आहे दैनिकाचे संपादक असल्याने त्यांना पत्रकारांच्या प्रश्नाची माहिती व जाण असल्याने पत्रकारांसाठी पत्रकार सुरक्षा समिती करत असलेल्या आंदोलन उपोषण निवेदन सारख्या लढ्यात त्यांनी नेहमीच सहभाग नोंदवला आहे
युवा पत्रकार आयाज शेख यांनी दैनिक लोकप्रधान च्या माध्यमातून निरपेक्ष निर्भीड अन सडेतोड पत्रकारिता केली असून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून त्यांनी आपली पत्रकारिता जपली आहे
अश्या युवा डॅशिंग पत्रकार आयाज शेख यांचा वाढदिवस असून त्यांना निकोप निरोगी व दीर्घायुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
यशवंत पवार
संपादक
कार्यसम्राट न्यूज सोलापूर.

