Type Here to Get Search Results !

बाळे भागात पोलिसांची धडक मोहीम; बेशिस्त पार्किंगसह अनधिकृत फलकांवर कारवाई. वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त; फौजदार चावडी पोलिसांचा विशेष मोहिमेद्वारे कारवाईचा धडाका




सोलापूर : प्रतिनिधी

उत्तर सोलापूर भागातील बाळे कॉर्नर येथे वाढती रहदारी, बेशिस्त वाहन पार्किंग तसेच दुकानांच्या बाहेर लावण्यात आलेल्या अनधिकृत फलकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे या परिसरातील नागरिक आणि वाहनधारक त्रस्त झाले होते.


या समस्येची दखल घेत फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विशेष मोहीम राबवून बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनांवर तसेच दुकानांसमोर अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या फलकांवर कारवाई सुरू केली आहे.


पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे बाळे कॉर्नर परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होत असून, नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.