Type Here to Get Search Results !

दिग्गज पत्रकारांच्या भाऊ गर्दीत हटके पत्रकरिता जपणारा युवा पत्रकार अक्षय बबलाद.

 



मूर्ती लहान पण कीर्ती महान हे वाक्य फक्त युवा धाडसी पत्रकार अक्षय बबलाद यालाच लागू पडते युवा वयात बापाचे छत्र हरपले ज्या वयात मौजमस्ती करायची नेमकं त्याच वयात अक्षय बबलाद यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला हार मानणारा तो पत्रकार कसला? 


होय मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय अन लिहितोय वृत्तपत्रामधील जीवघेणी स्पर्धा लेखणीचा संघर्ष अन चडउतार अक्षयने खूप कमी वयात पाहिलं आहे अतिशय कमी वयात तो पत्रकार झाला वडिलांचे निधन अन कौटुंबिक जबाबदारी एकाच वेळी अक्षयच्या अंगावर येऊन पडली या दुःखद घटना बाजूला सारून अक्षयने धसका न्यूज ला सुरुवात केली 



सोलापूर शहर जिल्हासह महाराष्ट्र राज्यातील ताज्या बातम्या अन घडामोडी तो धसका न्यूज च्या माध्यमातून मांडू लागला या बाबी करत त्याने पत्रकारितेचे शिक्षण घेऊन तो डिग्री देखील मिळवली इतक्या कमी तो दैनिक लोकशाही मतदार या वृत्तपत्राचा संपादक झाला सर्वसामान्य पत्रकार वयाचा पन्नाशी नंतर संपादक होतो त्याला अक्षय बबलाद अपवाद आहे अतिशय कमी वयात पत्रकारिताची माहिती अन ज्ञान आत्मसात करून तो भल्याभल्या अनुभवी पत्रकारांना पाठीमागे सारत आपली निरपेक्ष निर्भीड अन सडेतोड पत्रकारिता सुरु ठेवली 



अतिशय कमी वयात स्तंभ लेखन अग्रलेख व संपादकीय लेखन अक्षय बबलाद यांनी केलं आहे आज त्याने सोलापूर शहरात टॉपचा पत्रकार म्हणून आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे 


दैनिकाचा संपादक होणे ते ही किशोर वयात जोक नाही संपादक म्हणजे वृत्तपत्राचा कणा असतो मोठी जबाबदारी असते त्यासाठी फार मोठा अभ्यास लागतो 


युवापत्रकार अक्षय बबलाद हा सोलापूर येथील रहिवाशी असून लहानपणापासून त्याला समाजसेवा बरोबर पत्रकारितेची आवड होती   


अक्षय ने पत्रकारिता एक ध्यास चळवळ व विचार समजून सोलापूर शहरातील वंचित पिढीत घटकांच्या विकासासाठी न्याय हक्कासाठी य नेहमीच आपल्या लोकप्रिय दैनिक लोकशाही मतदार वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत जिथं अन्याय तिथं त्यांची लेखणी पेटून उठायची सवय अक्षय ला बालपणापासूनच होती त्याने अनेक चळवळीत सक्रिय सहभाग घेतलेला आम्ही पाहिला आहे 



समाजातील गोरगरीब अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या मदतीला अक्षय नेहमीच धावून जातोय सरकारी दरबारात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय सर्वसामान्य माणसांशी नाळ जोडणारा पत्रकार म्हणून अक्षय ची सोलापूर शहरात आगळी वेगळी छाप अन ओळख आहे  


समाजातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याने आजवर अनेक वेळा विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करण्याचा प्रामाणिक पणे प्रयत्न केला आहे 



*पत्रकारांच्या प्रश्नाची जाण*


युवा पत्रकार अक्षय बबलाद याने पत्रकार सुरक्षा समितीचा प्रसिद्धी प्रमुख म्हणून मोठी जबाबदारी देखील प्रामाणिक पणे पार पाडली आहे दैनिकाचे संपादक असल्याने अक्षय ला पत्रकारांच्या प्रश्नाची माहिती व जाण असल्याने पत्रकारांसाठी पत्रकार सुरक्षा समिती करत असलेल्या आंदोलन उपोषण निवेदन सारख्या लढ्यात त्याचा नेहमीच सहभाग असायचा युवा पत्रकार अक्षय ने यांनी दैनिक लोकशाही मतदार च्या च्या माध्यमातून निरपेक्ष निर्भीड अन सडेतोड पत्रकारिता केली असून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून त्याने आपली पत्रकारिता जपली आहे 


अश्या युवा संघर्ष वादी पत्रकार अक्षय बबलाद याचा आज वाढदिवस असून त्याला निकोप निरोगी व दीर्घायुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 


यशवंत पवार 

प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र 

💐💐💐🎉🎉🎉 💐💐💐🎉🎉🎉🎉🎉

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.