Type Here to Get Search Results !

दैनिक लोकप्रधान संपादक आयाय शेख यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समिती वतीने सत्कार

 



सोलापूर (प्रतिनिधी ) युवा पत्रकार आयाज हे सोलापूर येथील रहिवाशी असून लहानपणापासून त्यांना समाजसेवा बरोबर पत्रकारितेची आवड होती   


पत्रकारिता एक ध्यास चळवळ व विचार समजून सोलापूर शहरातील वंचित पिढीत घटकांच्या विकासासाठी न्याय हक्कासाठी युवा पत्रकार अयाज शेख हे नेहमीच आपल्या लोकप्रिय दैनिक लोकप्रधान वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत जिथं अन्याय तिथं त्यांची लेखणी पेटून उठायची समाजातील गोरगरीब अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या मदतीला अयाज शेख नेहमीच धावून जातात सरकारी दरबारात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात सर्वसामान्य माणसांशी नाळ जोडणारा पत्रकार म्हणून आयाज शेख यांची सोलापूर शहरात आगळी वेगळी ओळख आहे.


समाजातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आजवर अनेक वेळा विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करण्याचा प्रामाणिक पणे प्रयत्न केला आहे त्यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समिती वतीने शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या 

यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार सोलापूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष बसवराज हमाले जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू सचिव रमेश दग्गारी समन्वयक लक्ष्मण सुरवसे व्यंकटेश सुंचू दैनिक अबतक चे संपादक प्रसाद जगताप जेष्ठ पत्रकार सलाउद्दीन शेख श्रीनिवास पेद्दी इत्यादी पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.