Type Here to Get Search Results !

सहाय्यक फौजदार बाळासाहेब गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान, पोलीस मित्र सोशल फौंडेशनचा सामाजिक उपक्रम.

 



सोलापूर (प्रतिनिधी ) मानवाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांपैकी अन्न ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. म्हणूनच भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देणे म्हणजेच प्राणदान करण्यासारखे आहे. भारतीय संस्कृतीत अन्नदानाला सर्व दानांमध्ये सर्वश्रेष्ठ दान (महादान) मानले गेले आहे.अन्नदानाचे महत्त्वप्राणदान: इतर दानांमुळे माणसाला सुख किंवा वस्तू मिळतात, पण अन्नदानामुळे माणसाचा जीव वाचतो व त्याला थेट जगण्याचे साधन मिळते.आत्मिक समाधान: अन्नदानामुळे जेवणारा आणि अन्न देणारा दाता या दोघांनाही एकाच वेळी खरे आणि प्रत्यक्ष समाधान मिळते. त्याच बरोबर 

पुण्यप्राप्ती देखील मिळते धार्मिक ग्रंथांनुसार, अन्नदान केल्याने माणसाला पुण्य लाभते आणि जीवनातील सर्व सुख-समाधान मिळते सोलापूर येथील पोलीस आयुक्त कार्यालय येथे कार्यरत असणारे सर्वसामान्य माणसाला कायद्याच्या चौकटीत राहून मदत करणारे 




वंचित पिढीत घटकाच्या न्याय हक्कासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे केवळ पोलीस दलात नव्हे तर सोलापूर शहरातील राजकीय सामाजिक लोकांबरोबर अंत्यत जिव्हाळ्याचे संबंध असणारे सर्वाना सोबत घेऊन काम करणारे सर्वांचे लाडके सहाय्यक फौजदार बाळासाहेब गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस मित्र सोशल फौंडेशन वतीने शहरात विविध ठिकाणी अंध अपंग व निराधार लोकांना मिठाई वाटप करून अनोखा सामाजिक उपक्रम राबवला आहे.त्याच बरोबर सामाजिक बांधलकी देखील जपली आहे 

यावेळी संस्थापक यशवंत पवार सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे शहर कार्यकारी अध्यक्ष बसवराज हमाले संघटक अतुल भडंगे उपाध्यक्ष रमेश दग्गारी श्रीनिवास पेद्दी व्यंकटेश सुंचू जैद बागवान सुफी शेख उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.