Type Here to Get Search Results !

प्रतिकूल परिस्थिती ला आव्हान देत थेट गगनाला गवसनी घालत कळसुबाई शिखर चढाई करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत




सोलापूर (प्रतिनिधी ) येथील फौजदार चावडी पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी निसर्गाच्या सानिध्यात आनंद काय असतो हे जगाला दाखवून दिलं आहे 


पोलीस अधिकारी म्हटलं की सततचा बंदोबस्त ताण तणाव ओघाने आलाच सोलापूर शहर हे उत्सव प्रिय म्हणून महाराष्ट्र राज्याला परिचित असलेलं शहर या शहरात अठरा पगड जातीने लोक राहात असलेने डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे छत्रपती संभाजी महाराज जयंती गणेशोत्सव दसरा सह विविध जयंती च्या मोठया प्रमाणात मिरवणूका काढल्या जातात यात शेकडो तरुण तरुणी सह अबालवृद्ध सहभागी होत असतात. 

कळसुबाई 

हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकऱ्यांनी पायऱ्यांची शेती केलेली आहे. कठीण कातळटप्प्यांवर शिड्या बसविलेल्या आहेत. 

त्यामुळे ३ ते ४ तासात कळसूबाईचे शिखर सर करणे सहज शक्य आहे. भंडारदरा धरण येथून ६ कि.मी वर आहे. तेथे २ दिवस मुक्काम करून कळसूबाई , रंधा धबधबा, कोकणकडा इत्यादी ठिकाणे पाहाता येतात.


कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. बारी हे गाव कोळी महादेव या आदिवासी जमातीचे आहे. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे.


सह्याद्री पर्वत रांगेतील महाराष्ट्रामधील सर्वोच्च शिखर कळसूबाई आणि नाणेघाटाच्या सानिध्यातील हरीश्चंद्रगड यांच्या आसपासचा सुमारे ३६१.७१ चौ. कि. मी चा डोंगराळ, दुर्गम परिसर महाराष्ट्र शासनाने इ. स १९८६ मध्ये अधिघोषित केला आहे. मुळा, प्रवरा, आढळा, म्हाळुंगी या नद्यांचे खोरे आणि उत्तुंग अशी गिरी शिखरे असा हा अप्रतिम सृष्टी सौंदर्याने नटलेला परिसर असून, इ. स १९१० ते १९२४ या काळात उभारण्यात आलेले भंडारदरा धरण आणि या धरणामुळे निर्माण झालेला सर आर्थर लेक हा जलाशय आणि त्याच्या सभोवतालचा परिसर अनेक देशी – विदेशी पक्ष्यांना आकर्षित करतो. येथे पक्ष्यांचा अधिवास ही मोठ्या प्रमाणात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या या अभयारण्याला विपुल जैवविविधता लाभली आहे.


या क्षेत्रात दक्षिण उष्ण कटीबंधीय आर्द मिश्र पानगळीची वने, काटेरी वने तर काही भागात सदाहरित वने अशी वनांची विविधता येथे आढळून येते. या अभयारण्यात हिरडा, जांभूळ, चांदवा, बहावा, कुंभल, कुडल, सिरस, पांगारा, कराप, आवळा, अशिंद, बेहडा, खारवेल, कळंब, सावर, सादडा, अर्जुन, धामण, अशी नानाविविध वृक्षसंपदा येथे पाहायला मिळते.


या अभयारण्यात बिबळे, रानमांजरी, ताडमांजर, मुंगुस, तरस, कोल्हे, लांडगे, रानडुक्कर, भेकर, ससा, सांबर, शेकरू, घोरपड हे वन्यप्राणी देखील येथे बघायला मिळतात. विविध प्रजातीचे साप व सरडे सुद्धा येथे दिसून येतात. येथील जलाशय परिसरात करकोचे, बगळे, शराटी असे पाणपक्षी देखील येथे निदर्शनास येतात.


पोलीस दलाची सेवा करत असताना देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी काही छंद जोपासले आहेत पावसाळ्यात कळसुबाई शिखर चढाई करणे म्हणजे मोठे आव्हान निसरडी पायवाट वरून धोधो कोसळणारा पाऊस सुसाट्याचा वारा पायाखाली चिखल चुकून तोल जरी गेला तर थेट मृत्यूची गाठ असा हा जीवघेणा प्रवास कळसुबाई सारख्या उंच शिखरावर चढाई करणे म्हणजे अतिशय मोठे आव्हान सततचा अंगावर कोसळणारा पाऊस झोम्बणारा गारवा अतिशय प्रतिकूल परिस्थिती चा सामना करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी 


आपल्या प्रचंड इच्छाशक्ती च्या जोरावर डोंगर दऱ्या निसरड्या पायवाटा चालून थेट कळसुबाई शिखराला गवसनी घालत चढाई केली असून पोलीस दलातील पहिलाच राज्यातील पोलीस अधिकारी असावा ज्यांनी नौकरी करत असे छंद जोपासले आहेत. पोलीस दलात काम करत असताना केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर मनुष्य काहीही करू शकतो हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी जगाला दाखवून दिलं आहे 


पोलीस दलात सेवा करत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हवामान खराब असताना अंगावर कोसळणारा प्रचंड पाऊस सुसाट वारा अन जीवघेणा प्रवास या सर्व बाबीवर मात करत केवळ आपल्या प्रबळ इच्छाशक्ती मुळे महादेव राऊत यांनी कळसुबाई शिखर पार केले आहे 





आजच्या युवकांना व पोलीस दलातील अंमलदारांना नवी ऊर्जा व प्रेरणा मिळावी म्हणून आपण धाडसी काम केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी आवर्जून सांगितले तसेच संभाजी नगर येथील ज्ञान योग मुळेच सर्व काही शक्य झाल्याचे सांगत जय गुरुदेव माऊली यांच्या सहवासात राहिल्यामुळे 


व्याधीग्रस्त आजारी व वयोवृद्ध साधकांनी देखील शिखर पार केल्याचे नमूद केले आहे 

कळसुबाई शिखर पार करून महादेव राऊत यांनी पोलीस दलाची शान व उंची वाढवली आहे 

त्यांच्या या धाडसी कामगिरीचे पोलीस मित्र सोशल फौंडेशन ने कौतुक करून पोलीस फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे शाल व पुष्पगुछ देऊन सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत 





यावेळी संस्थापक यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे सोलापूर शहर अध्यक्ष अंबादास गज्जम कार्यकारी शहर अध्यक्ष बसवराज हमाले उपाध्यक्ष रमेश दग्गारी जेष्ठ पत्रकार अरुण सिडगिद्दी जैद बागवान पोलीस अंमलदार रवी परबत आतिष पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.