पोलीस दलाची आण बाण अन शान असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब गायकवाड सोलापुरातील पोलीस दलात अनेक वर्षांपासून कार्यरत असून ते सध्या पोलीस आयुक्त कार्यालय येथे सेवा बजावत आहेत त्यांच्या नावाची जादू अन धमक केवळ पोलीस दलात नव्हे संपूर्ण सोलापूरवासियांना माहिती आहे
पोलीस खाते किंवा अन्य खात्याची कसलीही अडचण असू फक्त बाळासाहेब गायकवाड यांचा केवळ फोनचं नाही तर नाव सांगितले तरी दूर होते अशी प्रामाणिक भावना सोलापूर मधील सर्वसामान्य माणसाची झाली आहे बाळासाहेब म्हणजे पोलीस दलातील एक आगळं वेगळं नाव
शहरातील खून जबरी चोरी मोटारसायकल चोरी सह इतर अनेक बडे गुन्हे उकल करण्यात त्यांचा अतिशय महत्वपूर्ण सहभाग असून सोलापूर शहरात कायदा सूव्यवस्था त्याच बरोबर सामाजिक सलोखा राखण्यासाठी बाळासाहेब गायकवाड यांचे मोठे योगदान आहे
अश्या बाबतीत बाळासाहेब नेहमीच दक्ष अन सजग असतात
समाज कोणताही असो जो अडचणीत आहे त्याला बाळासाहेब गायकवाड यांच्या मदतीची गरज वाटते अनेकांना ते जणू आधारवढ वाटतात
कोणत्याही समाजातील
अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त त्याच बरोबर वंचित पिढीत घटकावर कोणताही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून नेहमीच बाळासाहेब गायकवाड काळजी व खबरदारी घेत असतात अन्यायपिढीत व्यक्ती ला कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ते समुपदेशनसह मार्गदर्शन करून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असल्याने
ज्यांना आपल्यावर खरंच अन्याय झाला अशी माणसे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब गायकवाड यांना आवर्जून भेटून आपली अडचण व कैफियत सांगतात बाळासाहेब गायकवाड यांचा मित्र परिवार खूप मोठा असून
शहरातील कोणत्याही पोलीस
ठाण्याच्या हद्दीत एखादी अप्रिय घटना किंवा वादग्रस्त विषय आला की बाळासाहेब गायकवाड कुठे आहेत? त्यांना बोलवा म्हणून अधिकारी सांगतात कारण बाळासाहेब गायकवाड तिथे आले की विषय संपतो अशी भावना अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या /कर्मचाऱ्यांच्या मनात आज देखील आहे
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब गायकवाड यांचे सर्वच समाजातील प्रतिष्ठित राजकीय सामाजिक लोकांबरोबर अतिशय चांगले संबंध असून सोलापूर शहरातील अनेक पत्रकारांबरोबर देखील मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे बाळासाहेब गायकवाड हे नाव कायम चर्चेत असते
पत्रकारांमध्ये त्यांनी कधी भेदभाव केलेला नाही पत्रकार लहान असो वा मोठा बाळासाहेब गायकवाड यांच्याकडे गेल्यावर त्या पत्रकारांची जिवलग मित्राप्रमाणे विचारपूस करून चहा घेण्याचा ते नेहमीच आग्रह धरतात बाळासाहेब गायकवाड यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचे अनेक पत्रकार बांधव मित्र आहेत
वरकरणी जरी बाळासाहेब शांत संयमी अन हसतमुख वाटत असले तरी ज्याच्यावर अन्याय झाला त्याला न्याय देण्यासाठी मात्र अत्यंत कठोर अन आक्रमक होतात. याची अनेकांचा केवळ अनुभवच नव्हे तर काही लोकांना प्रचिती देखील आली आहे बाळासाहेब गायकवाड यांनी
आपल्या कामाचा आगळा वेगळा ठसा उमटवला आहे
बाळासाहेब म्हणजे पोलीस दलाची शान अडचणीत धावून येणारा सखा बंधू मित्र अशी भावना सर्वसामान्य माणसाबरोबर पोलीस बांधवाची देखील आहे.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब गायकवाड यांचा आज वाढदिवस असून कार्यसम्राट न्यूज वतीने त्यांना आभाळभर उदंड आयुष्याच्या शुभेच्छा..
यशवंत पवार
संपादक
कार्यसम्राट न्यूज सोलापूर
💐💐💐💐💐💐💐🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💐

