Type Here to Get Search Results !

सोलापूर शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी. पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवत तब्बल सहा लाख ऐंशी हजार रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या टोळीतील चार आरोपींना गुन्हे शाखेने केली अटक

 



सोलापूर (प्रतिनिधी ) फिर्यादीला पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवत मोदी बोगदा, स्मशानभूमीजवळील सार्वजनिक रस्त्यावर बोलावून घेण्यात आले.


फिर्यादी तेथे पोहोचल्यानंतर आरोपींचे इतर तीन साथीदारही घटनास्थळी आले. त्यांनी आपण पोलीस असल्याची बतावणी केली, फिर्यादीला मारहाण केली आणि त्याच्याकडील सहा लाख ऐंशी हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली.


याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८२२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.


गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.


त्यानंतर तपासाला वेग आला.


२८ सप्टेंबर रोजी पोलीस अंमलदार हाजीमलंग शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली.


वांगी रोड, सोलापूर येथील मोकळ्या मैदानात चार संशयित इसम एक स्विफ्ट कार आणि एका दुचाकीसह थांबलेले आहेत, अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.


माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांच्या पथकाने तातडीने वांगी रोड येथे धाव घेतली 


पोलिसांनी शिताफीने दमदार कारवाई करत चार संशयितांना ताब्यात घेतले.


ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये संतोष राजाप्पा पाटील, महिबूब युसूफ विजापूरे, मल्लिकार्जुन यल्लप्पा शिवळ्ळी आणि मंजुनाथ कल्याणराव निडोदे यांचा समावेश आहे.


पोलिसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासादरम्यान या आरोपींनी सदर दरोड्याचा गुन्हा केल्याचे कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


आरोपींकडून पाच लाख पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम, एक स्विफ्ट कार, एक मोटारसायकल आणि पाच मोबाईल फोन, असा एकूण चौदा लाख चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


ही कारवाई सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार हाजीमलंग शेख, अनिल जाधव, रामेश्वर साखरे, कल्लप्पा देखाणे, अभिजित पवार आणि निलोफर तांबोळी यांनी सहभाग घेतला.


तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील मच्छिद्र राठोड, चालक सतीश काटे आणि बाळासाहेब काळे यांनीही कारवाईत सहभाग घेतला.


दरोड्याचा गुन्हा दाखल होताच तपासाची चक्रे वेगाने फिरवत चार आरोपींना ताब्यात घेणे आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करणे सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या या कारवाईकडे महत्त्वपूर्ण कामगिरी म्हणून पाहिले जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.