सोलापूर (प्रतिनिधी ) गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकारकडे पत्रव्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे
पत्रकारिता बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती ना विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र सन्मान चिन्ह देऊन गौरव केला जातोय
यंदाचा राज्यस्तरीय उद्योग रत्न पुरस्कार जयंत पुराणिक यांना जाहीर केल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख यांनी दिली आहे
जयंत पुराणिक यांचा परिचय
जयंत पुराणिक यांनी वयाच्या सतराव्या वर्षी वडिलोपार्जित डेअरी 17 व्या वर्षी सुरु केली असून
पंढरपूरात चक्का विकला जायचा त्यांनी प्रथमच तयार श्रीखंड विकायला सुरुवात केली तसेच
मिठाईचे दुकान चालू केले
कै शंकरराव पुराणिक उद्योग भवन हे आजोबांच्या स्वातंत्र्य सैनिक) उदयोग संकुल उभे केले यामुळे अनेकांना उद्योग व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या
शुक्ल यजुर्वेदी संस्थेच्या अधिवेशनात युवा संघटने अध्यक्षपद सांभाळले. त्यामुळे अनेक युवकांना व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळाले त्यांना मदतही केली आहे
मेंढे गल्लीतील डेअरी त्यांनी पश्चिम द्वार येथे सुरु केली डेअरी व्यवसायाबरोबर त्यांनी श्रीमंगल लॉज ही सुरु केले जनसेवेसाठी
भजनदास चौकान येथेत्यांनी डेअरीची दुसरी शाखा व नारायणी नावाने लॉज देखील निर्माण केले आहे व्यवसाय बरोबर त्यांनी समाजाचे भान राखत
याज्ञवल्क्य आश्रम पंढरपूर येथे अध्यक्षपद भूषवले
त्यांच्या कारकिर्दीत वेद् पाठशाळा सुरु केली अनेक संस्था मध्ये अनेक सुधारणा करून घेतल्या त्यांनी काही दिवस बॉक्सींग असोसिएशन चे सदस्य म्हणून ही काम पाहिले आहे त्यांना पत्रकार सुरक्षा समिती चा राज्यस्तरीय उद्योग रत्न पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
