सोलापूर (प्रतिनिधी ) शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त मनोजकुमार माधवराव यादव यांच्या प्रदीर्घ, उत्कृष्ट आणि शौर्यपूर्ण पोलीस सेवेचा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशपातळीवर गौरव झाला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून home ministry जाहीर करण्यात आलेल्या मानाच्या पोलीस पदकांमध्ये ACP मनोजकुमार यादव manoj kumar yadav यांना प्रतिष्ठेचे 'राष्ट्रपती पोलीस पदक' जाहीर झाले आहे.
३१ मार्च १९९५
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत थेट पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांनी पोलीस दलात प्रवेश केला. त्यानंतरची तब्बल ३१ वर्षांची कारकीर्द म्हणजे कर्तव्य, धाडस आणि तपासकौशल्याची प्रेरणादायी कहाणी. मुंबई, नागपूर, सोलापूर, ठाणे आणि पुणे अशा विविध ठिकाणी सेवा बजावताना त्यांनी अनेक क्लिष्ट आणि गंभीर गुन्ह्यांची उकल केली. त्यांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे अनेक आरोपींना कठोर शिक्षा झाली. कायदा-सुव्यवस्था असो, दंगल नियंत्रण असो किंवा व्हीआयपी बंदोबस्त… प्रत्येक जबाबदारी त्यांनी अत्यंत सक्षमपणे पार पाडली.
घोडेगाव येथे सराईत गुन्हेगाराला पकडताना झालेल्या चकमकीत दाखवलेले त्यांचे अजोड शौर्य त्यांच्या कारकिर्दीतील विशेष उल्लेखनीय अध्याय ठरले.
या आधीही त्यांच्या सेवेला
राज्य शासनाचे विशेष सेवा पदक,केंद्रीय गृह मंत्रालयाचे आंतरिक सुरक्षा सेवा पदक, पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह अश्या
अनेक सन्मानांनी गौरवण्यात आले आहे.
आता या सर्व सन्मानांच्या मुकुटात 'राष्ट्रपती पोलीस पदका'चा मानाचा तुरा खोवला गेला आहे.
वर्दी ही केवळ नोकरी नसते… ती जबाबदारी असते, शपथ असते आणि देशसेवेची ओळख असते. ACP मनोजकुमार यादव यांच्या या अभिमानास्पद कामगिरीला मनःपूर्वक सलाम !
त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांना भावी काळात अशीच जनतेची सेवा घडत राहो हिच सदिच्छा .
शुभेच्छुक !!
*यशवंत पवार*
प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र
संस्थापक -पोलीस मित्र सोशल फौंडेशन
संपादक -कार्यसम्राट न्यूज
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
संपादक -साप्ताहिक कार्यसम्राट सोलापूर
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
