सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर शहर जिल्ह्यातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पोलीस मित्र सोशल फौंडेशन वतीने सोलापूर चे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री नेरपगार व सहाय्यक प्रादेशिक परीवहन अधिकारी श्री मुलाणी यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली त्याच बरोबर
पोर्टल तात्काळ सुरु करा
आधार RC स्पेलिंग नियम मागे घ्या
PUC OTP सक्ती रद्द करा इत्यादी मागणी चे निवेदन सादर केले
गेल्या दोन महिन्यापासून सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत असलेले वाहन पोर्टल पूर्णपणे बंद असलेने वाहन खरेदी विक्री हस्तातरणं नवीन वाहन नोंदणी तसेच इतर अनेक महत्वाचे कामे ठप्प झालेने राज्य सरकार चा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडत आहे सर्वसामान्य नागरिक वाहन व्यवसायिक यांना मोठया आर्थिक परिस्थिती चा सामना करावा लागत आहे
या विषयावर RTO अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच लवकर आपल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून तात्काळ पोर्टल सुरु करावे आधार RC स्पेलिंग नियम पाठीमागे घ्यावेत PUC साठी OTP ची सक्ती रद्द करावी वरील मागणी चा विचार करून तात्काळ या बाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा म्हणून निवेदन सादर केले
यावेळी संस्थापक यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे संघटक कलीम शेख शहर अध्यक्ष अंबादास गज्जम उपाध्यक्ष रमेश दग्गारी सचिव गणेश निंबाळकर विष्णू सकट जैद बागवान बसवराज हमाले श्याम वायदंडे आसिफ काझी महेश मेटकरी राजकुमार शिंदे रेहमान जहागीरदार उपस्थित होते.

