सांगली (प्रतिनिधी )
कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि उल्लेखनीय प्रशासकीय कार्यातून जनतेच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारे तहसीलदार राजशेखर लिंबारे यांना ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्ड्स – सांगली’ अंतर्गत ‘उत्कृष्ट पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला,
तहसीलदार म्हणून कार्यरत असताना राजशेखर लिंबारे यांनी प्रशासकीय जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडताना सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. महसूल प्रशासन, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांच्या विविध समस्या सोडविणे तसेच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याची वेगळी छाप निर्माण केली आहे,
त्यांच्या कार्यातील तत्परता, शिस्त, पारदर्शकता आणि जनसेवेची तळमळ याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळाला आहे. ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्ड्स – सांगली’मध्ये मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि उल्लेखनीय प्रशासकीय कार्याला मिळालेली कौतुकाची पावती मानली जात आहे
लिंबारे यांच्या सन्मानामुळे त्यांच्या सहकाऱ्यांसह नागरिकांमध्येही आनंदाचे वातावरण असून, त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे,
कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्या या यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या हातून भविष्यातही अशीच उल्लेखनीय आणि प्रेरणादायी जनसेवा घडत राहो, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.
