सोलापूर (प्रतिनिधी ) महाराष्ट्रात राज्यात पत्रकारांवर होणारे हल्ले, मारहाण, धमकी सारखे प्रकार वारंवार घडत असून बातमी लावण्यावरुन वाळू माफिया, गुटखा माफिया, व राजकिय लोकांकडुन पत्रकारावर नेहमीच हल्ले होत आहेत. बातमी लावण्यावरुन हल्ले धमकी, मारहाण असा प्रकार होत असेल तर पत्रकारीता करायची कशी ? असा प्रश्न निर्माण झाला असून लोकशाहीचा चौथा स्तंभ आज अत्यंत बिकट अवस्थेतुन वाटचाल करीत आहे. अशातच ग्रामीण भागातील पत्रकारावर बातमी लावण्यावरुन खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहेत. वास्तविक पाहतां ग्रामीण भागातील पत्रकार' अल्प मानधनावर काम करतात. त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची असते. अशातच खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल झाल्याने त्या पत्रकारांचे कंबरडे मोडले आहे. काही अवैध व्यवसायीक व प्रशासकीय अधिकारी पोलीस अधिकाऱ्यांची /कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून व चुकीची माहिती देऊन ग्रामीण भागातील प्रामाणिक पत्रकारांवर दबाब आणण्यासाठी खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखला करतात ही बाब अतिशय गंभीर असून लोकशाहीला मारक आहे खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल झाल्याने पत्रकारांची जनसामान्य माणसात प्रतिमा खराब व मालिन होते सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ पंढरपूर अक्कलकोट सह अन्य तालुक्यात अनेक पत्रकारांवर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल आहेत या बाबत विशेष पोलीस महानिरीक्षक साहेबांनी ज्या पत्रकारांवर खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत या अश्या पत्रकारांची स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी मार्फत चौकशी करावी अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्ठमंडळाने विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांची कोल्हापूर येथे भेट घेऊन केली आहे
यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार सोलापूर जिल्हा जिल्हा संघटक अरुण सिडगिद्दी सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे सचिव रमेश दग्गारी संघटक गणेश निंबाळकर रशीद शेख बसवराज हमाले परमेश्वर आटीपामूल उपस्थित होते.
*पत्रकारांवरील खंडणी गुन्हे बाबत सखोल चौकशी न झाल्यास आंदोलन*-यशवंत पवार
सर्वसामान्य माणसांचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून वंचित पिढीत अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांना लेखणीच्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका पार पाडणाऱ्या प्रामाणिक पत्रकारांवर खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल होत असतील तर पत्रकारिता करायची कशी? असा सवाल प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी उपस्थित केला असून खंडणी सारख्या गंभीर गुन्ह्यामुळे पत्रकारांची समाजात बदनामी होऊन प्रतिमा खराब होते सोलापूर जिल्ह्यातील ज्या पत्रकारांवर खंडणीसारखे गंभीर गुन्ह्यांची उपविभागीय पोलीस अधिकारी मार्फत स्वतंत्र चौकशी करावी अन्यथा पत्रकार सुरक्षा समिती वतीने रस्त्यावर आंदोलन करावे लागेल असा इशारा प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी यावेळी दिला आहे.

