Type Here to Get Search Results !

राज्यात डीजे मुक्तीचा इतिहास रचणारे लाडके पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना वाढदिवसाच्या कार्यसम्राट च्या लेखणीतून हार्दिक शुभेच्छा.




सोलापूर शहरातील गुन्हेगारांना धडा शिकवणारे धडाडीचे अधिकारी म्हणून पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोलापूरात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करून शहर वासियांचीमने जिंकली असून 

सोलापूर शहर हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक दृष्ट्या महत्वाचे शहर आहे. गेल्या काही वर्षांत या शहरात गुन्हेगारीचे सावट पसरले होते. अशा परिस्थितीत सोलापूर शहराच्या कायदा सुव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी कंबर कसली असून आपल्या धाडसी कर्तृत्वाने आणि कठोर कारवाईने गुन्हेगारांचे कंबरडे मोडले सोलापूरकर एम राजकुमार यांच्या यशस्वी कार्यकिर्दी चे व वाढदिवसाचे कौतुक करून शुभेच्छा देत आहेत. पोलीस आयुक्त एम राजकुमार हे कठोर अधिकारी आहेत त्याच बरोबर जनतेसाठी अतिशयसंवेदनशील व भावुक देखील आहेत

एम. राजकुमार हे त्यांच्या धमाकेदार अन धडाडीच्या कारवाईसाठी ओळखले जातात. त्यांनी सोलापूरमध्ये पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून शहरातील गुन्हेगार, अंमली पदार्थ विक्रेते, टोळ्या व माफिया यांच्यावर सतत धडक कारवाया केल्या. 

गुंडोवालों जरा होशियार यहाँ कें हम हें राजकुमार म्हणत

*कायद्यापुढे कोणीही मोठा नाही*

हा संदेश त्यांनी शहरातील गुन्हेगारांना दिला. त्याचवेळी, नागरिकांशी संवाद साधताना ते अत्यंत संवेदनशील सजग आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून उभे राहिले.


*गुन्हेगारांवर धडक अन कडक कारवाई*




सोलापूरमध्ये अंमली पदार्थांची वाढती समस्या, अवैध दारू, जुगार अड्डे, भूमाफिया, वाळू माफिया गुटखा माफिया घरफोडी, जबरी घरफोडी खून वाहन चोरी यांसारख्या गुन्ह्यांवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी विशेष मोहिमा राबवल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत 


शहरातील अनेक बड्या व कुख्यात गुन्हेगारांना कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता तडीपार मोक्का सारख्या धडाकेबाज कारवाई करत थेट तुरुंगात डांबले 


शहरातील टोळीगिरी, दहशत पसरवणारे आणि निरपराध जनतेला त्रास देणाऱ्यांना पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या कठोर धाडसी व बेधडक कारवाईचा सामना करावा लागला.

गुन्हेगारांवरच नव्हे तर त्यांच्या मुळापर्यंत जाऊन टोळी उद्ध्वस्त करण्याची धमक अन पद्धत एम राजकुमार स्वीकारली.

       *नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य*

एम. राजकुमार यांनी फक्त गुन्हेगारी आटोक्यात आणली नाही, तर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी अनेक सकारात्मक उपक्रम देखील राबवले.

*महिलांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन व विशेष पथक कार्यान्वित केले*

शहरातील शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणी जनजागृती कार्यक्रम राबवले.


शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कडक अंमलबजावणीसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला.त्याच बरोबर 

लोकाभिमुखता आणि विश्वास संपादन करून 

पोलिसांविषयी समाजात विश्वास निर्माण करणे हे सोपे नाही. पण आयुक्त एम. राजकुमार यांनी ते करून दाखवत साध्य देखील केले.

नागरिकांना कोणत्याही समस्येत अन अडचणीत मदत करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार नेहमी पुढे असतात.

*गुन्हेगारीबाबत माहिती देणाऱ्या नागरिकांचे रक्षण करण्याची जबाबदारी एम राजकुमार त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली*

"पोलिस तुमचे मित्र" ही संकल्पना एम राजकुमार यांनी प्रत्यक्षात आणली.

पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना पदभार स्वीकारून दोन वर्षे पूर्ण झाली आहेत सोलापूरकरांचा एकच स्वर आहे 

*डीजेमुक्तीचा इतिहास रचणारा पोलीस आयुक्त म्हणून महाराष्ट्र राज्यात वेगळी ओळख*

सोलापूर शहर हे उत्सवप्रिय शहर म्हणून राज्यात ओळखलं जातंय अन मोठया मिरवणूका निघतात ज्यात डीजे लेसर किरणे सारखे नागरिकांच्या जीवाला धोका व इजा पोहोचणारे साउंड वाजवले जात होते याचा वेळीच धोका ओळखून शहरातील सर्वच समाज घटकातील त्याच बरोबर राजकीय नेत्यांना सोबत चर्चा करून डीजेचे दुष्परिणाम समजावून सांगत सोलापूर शहर हे डीजेमुक्त करण्यासाठी अनेक धडाडीचे पाऊले उचलून शहर डीजेमुक्त करण्यात आलेने राज्यात डीजेमुक्तीचा इतिहास रचणारे पोलीस आयुक्त म्हणून राज्यात आगळी वेगळी ओळख 




"गुन्हेगारांचा धसका, नागरिकांचा विश्वास – अशा धडाडीच्या पोलीस आयुक्तांचा दोन वर्षाचा कार्यकाळ सोलापूरकरांना अतिशय दिलासदायक व समाधानकारक ठरला आहे त्यांची पुढील वाटचाल 

 जनतेच्या सेवेसाठी प्रेरणादायी ठरो, हीच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 

           आपलाच 

             *यशवंत पवार*

 प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र 

संस्थापक -पोलीस मित्र सोशल फौंडेशन 

 संपादक- साप्ताहिक कार्यसम्राट 

 संपादक -कार्यसम्राट न्युज सोलापूर.

💐💐💐🎉🎉🎉 💐💐💐💐🎉🎉🎉🎉

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.