सोलापूर (प्रतिनिधी ) कर्तव्य बजावताना कुटुंबापासून दूर असलेल्या लोहमार्ग पोलिसांप्रति आपुलकी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानतर्फे रक्षाबंधनानिमित्त रेल्वे स्टेशन येथील लोहमार्ग पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना औक्षण करून राखी बांधण्यात आली. प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे चे यंदाचे नववे वर्ष आहे.
सोलापूरसह दौंड, कुडुवाडी, पुणे, लोणावळा धाराशिव व लातूर येथून आलेल्या लोहमार्ग पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिष्ठानच्या पदाधिकारी महिलांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले . प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रांत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत
रक्षाबंधन साजरे केले जाते. यापूर्वी एसटी चालक वाहक, पोस्टमन, रेल्वे टीसी, ट्रकचालक आदींना राखी बांधून
सन्मान व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी पोलिस उपनिरीक्षक शब्बीर तांबोळी, इनामदार, दत्तात्रय वाघमोडे नंदकुमार
राठोड, प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट, मनुश्री कासट, शुभांगी लचके अक्षता कासट, शीला तापडिया, रूपा कुत्ताते, प्रियांका जाधव, सुजाता सक्करगी, भारती जवळे आदी उपस्थित होते.
*आमच्यासाठी भावनिक अविस्मरणीय क्षण*-पोलीस उपनिरीक्षक शब्बीर तांबोळी
बहिणींनी वेळ काढून पोलिस ठाण्यात येऊन राखी बांधली, हा आमच्यासाठी भावनिक आणि अविस्मरणीय क्षण आहे. त्यांचे हे प्रेम आम्ही कधीही विसरणार नाही. समाजाच्या सुरक्षेसाठी आमची कुठेही गरज भासल्यास आम्हाला नक्की बोलवा, असे पोलिस उपनिरीक्षक शब्बीर तांबोळी यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
