Type Here to Get Search Results !

लाखोंची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक २१.१९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत एमआयडीसी डी बी पथकाची दमदार कारवाई.

 



​सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर येथून कर्नाटक येथे पाठवण्यासाठी भरलेला ५ लाख ५४ हजार २५८ रुपयांचा पी.व्ही.सी. पॅनल पट्टीचा माल परस्पर अपहार करून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने शिताफीने अटक केली आहे. आरोपीकडून चोरीचा माल, गुन्ह्यात वापरलेला आयशर ट्रक व दोन मोबाईल असा एकूण २१ लाख १९ हजार २५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​प्रतिक निंबाळकर (वय २६, रा. गोपाळवाडी, ता. दौंड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

​ फिर्यादी परवेज फेजअहमद मोहोळकर (रा. जुने विडी घरकुल, सोलापूर) यांचा मालवाहतुकीचा व्यवसाय आहे. ३१ जुलै २०२६ रोजी आरोपीने भाड्याने मालवाहतूक करण्याचे सांगून विश्वास संपादन केला. सोलापूर येथील एका व्यापाऱ्याचा ५.५४ लाखांचा पी.व्ही.सी. पॅनल पट्टीचा माल आयशर ट्रकमध्ये भरून तो विजयपूर (कर्नाटक) येथे न पोहोचवता परस्पर अपहार करून फसवणूक केली. याप्रकरणी ३ ऑगस्ट २०२६ रोजी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​२४ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपी अक्कलकोट रोडवरील बी.एस.एन.एल. टॉवरजवळ बनावट नंबरप्लेट लावलेला आयशर ट्रक घेऊन थांबल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख व त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने साथीदार पंकज पारधे (रा. बारामती) याच्यासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली.




​५,५४,२५८ रुपयांचा पी.व्ही.सी. पॅनल पट्टीचा माल

​१५,००,००० रुपयांचा बनावट नंबरप्लेट लावलेला आयशर ट्रक (MH-15-JC-1792)

​६५,००० रुपयांचे २ मोबाईल फोन

​एकूण हस्तगत मुद्देमाल: ₹ २१,१९,२५८/-

​ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त प्रीतम यावलकर, सहा. पोलीस आयुक्त अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार, पोलीस निरीक्षक संगीता पाटील पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख पोलीस अंमलदार राकेश पाटील, एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन भांगे अय्याज बागलकोटे अमोगसिद्ध निंबाळ आणि सहकाऱ्यांनी केली. पुढील तपास पोलीस अंमलदार राकेश पाटील करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.