सोलापूर (प्रतिनिधी मानवाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांपैकी अन्न ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. म्हणूनच भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देणे म्हणजेच प्राणदान करण्यासारखे आहे. भारतीय संस्कृतीत अन्नदानाला सर्व दानांमध्ये सर्वश्रेष्ठ दान (महादान) मानले गेले आहे.अन्नदानाचे महत्त्वप्राणदान: इतर दानांमुळे माणसाला सुख किंवा वस्तू मिळतात, पण अन्नदानामुळे माणसाचा जीव वाचतो व त्याला थेट जगण्याचे साधन मिळते.आत्मिक समाधान: अन्नदानामुळे जेवणारा आणि अन्न देणारा दाता या दोघांनाही एकाच वेळी खरे आणि प्रत्यक्ष समाधान मिळते. त्याच बरोबर
पुण्यप्राप्ती देखील मिळते धार्मिक ग्रंथांनुसार, अन्नदान केल्याने माणसाला पुण्य लाभते आणि जीवनातील सर्व सुख-समाधान मिळते सोलापूर चे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस मित्र सोशल फौंडेशन वतीने शहरात विविध ठिकाणी अंध अपंग व निराधार लोकांना अन्नदान करून अनोखा उपक्रम राबवला आहे.
यावेळी संस्थापक यशवंत पवार सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे सोलापूर शहर अध्यक्ष अंबादास गज्जम उपाध्यक्ष रमेश दग्गारी संघटक गणेश निंबाळकर कार्याध्यक्ष रशीद शेख विष्णू सकट अक्षय देवकुळे श्याम वायदंडे अरुण सिडगीद्दी सिद्धू हमाले बसवराज हमाले उपस्थित होते.

