Type Here to Get Search Results !

डीजेचा आवाजा बरोबर पोलीस आयुक्तांचा पारा चढला नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

 



सोलापूर (प्रतिनिधी )

'डीजे'चा आवाज वाढला की आता गप्प बसायचे नाही, पोलिसांना फोन करायचा... नागरिकांच्या या सजगतेचा परिणाम एम. राज कुमार थेट

महर्षी मार्कंडेय महामुनींच्या रथोत्सव मिरवणुकीत पाहायला मिळाला. मिरवणुकीतील साऊंड सिस्टिमचा आवाज वाढल्याच्या तक्रारी नागरिकांनी थेट अधिकार्यांकडे केल्यानंतर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी मिरवणुकीत धावले. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आवाज मी करण्याच्या सूचना देण्यात आल्या 

दरम्यान, 'आधी समजावून सांगू न ऐकल्यास डेसिबल रीडिंग घेऊन कायदेशीर कारवाई करू असा 

 इशारा पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी दिला 


रथोत्सव मिरवणुकीत यंदा 29, मंडळांनी सहभाग नोंदविला  

होता. मिरवणुकीच्या सुरवातीलाच बहुतेक मंडळांनी साऊंड सिस्टिमचा आवाज मोठ्या प्रमाणात वाढविला. दरवर्षी मर्यादित आवाजात निघणाऱ्या या मिरवणुकीत यंदा मोठ्या आवाजाचा दणदणाट ऐकू आल्याने नागरिकांचेही लक्ष वेधले गेले. 'डीजेमुक्त सोलापूर'च्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी यावेळी केवळ आवाज सहन न करता थेट पोलिसांकडे तक्रारी केल्या. तक्रारींची दखल घेत पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त प्रीतम यावलकर डॉ. अश्विनी पाटील यांच्यासह अधिकारी व अंमलदार मिरवणुकीच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना आवाज कमी करण्याच्या सूचना केल्या. पोलिस अधिकारी उपस्थित असताना साऊंड सिस्टिमचा आवाज कमी झाला. मात्र, काही वेळाने अधिकारी पुढे गेल्यानंतर पुन्हा परिस्थिती 'जैसे थे' झाल्याचे चित्र होते. तरीही मिरवणुकीतील आवाज मर्यादित होता आणि आवाजाचे रीडिंग घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.