Type Here to Get Search Results !

शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांचा वाढदिवसानिमित्त पोलीस मित्र सोशल फौंडेशन वतीने सत्कार

 



सोलापूर (प्रतिनिधी ) सज्जनांचा सखा तर गुन्हेगारांचा कर्दनकाळ समजले जाणारे सर्वसामान्य माणसाला कायद्याच्या चौकटीत राहून मार्गदर्शन करून योग्य तो सल्ला देऊन न्याय देण्याची भूमिका पार पाडणारे सोलापूर शहरातील चोरी जबरी चोरी ड्रग खुना सारख्या गंभीर होण्याची अतिशय कौशल्यपूर्ण उकल करून जेलची हवा खाण्यास भाग पाडणारे सोलापूर शहरातील पत्रकारांना आपुलकीने वागवणारे प्रेमाने व मायेने विचारपूस करणारे पोलीस दलातील शांत संयमी व दिलखुलास व्यक्तीमत्व म्हणजेच अरविंद माने साहेब कायद्याच्या अभ्यासाबरोबरच पत्रकारांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारे त्याच बरोबर 

सोलापूर शहराच्या सुरक्षिततेसाठी, गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सतत झटणारे  शहर गुन्हे शाखेचे सिंघम म्हणून आगळी वेगळी ओळख असलेले कर्तव्य, निडरता आणि सेवाभाव यांचा उत्तम संगम असलेल्या माने सरांनी पोलिसी कार्यात जे योगदान दिले आहे, ते आज सोलापुरकरांसाठी अभिमानाचा विषय ठरले आहे.


   *कर्तव्यनिष्ठ अन कर्तव्य दक्ष अधिकारी*

अरविंद माने सरांचा पोलिसी प्रवास हा शिस्त, प्रामाणिकपणा आणि तात्काळ निर्णयक्षमता यांचा उत्तम नमुना आहे. मोठमोठे गुन्हे, गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई, गंभीर प्रकरणांतील जलद उकल – हे त्यांच्या कारकिर्दीतील ठळक पैलू आहेत. त्यांनी नेहमीच “कायदा सर्वोच्च” या तत्त्वाला प्राधान्य दिले असून, कोणत्याही दबावाला न जुमानता काम केले आहे.


   *शहर गुन्हे शाखेला लाभलेले दमदार अधिकारी*


अरविंद माने यांनी  कायद्याचे पालन करत सामान्य जनतेशी विश्वासाचे नाते निर्माण करण्यावर भर दिला आहे लोकांच्या समस्या ऐकणे त्यावर योग्य तो तोडगा काढणे यामुळे सोलापुरातील अनेकांसाठी ते लोकप्रिय ठरले आहे.

     *ठोस निर्णय अन कृतीशील व्यक्तीमत्व*

श्री अरविंद माने हे सोलापुरातील प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्यांचा सेवाभाव, कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा हे पोलिस दलासाठी आदर्शवत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी पोलीस मित्र सोशल फौंडेशन वतीने  शाल पुष्पगुछ व मिठाई भरवून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या 

यावेळी संस्थापक यशवंत पवार सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे शहर अध्यक्ष अंबादास गज्जम  उपाध्यक्ष रमेश दग्गारी सचिव गणेश निंबाळकर दैनिक अबतक चे संपादक प्रसाद जगताप जेष्ठ पत्रकार आन्सर तांबोळी अरुण सिडगिद्दी महमद तांबोळी संदीप धोत्रे इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.