Type Here to Get Search Results !

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वात शहर गुन्हे शाखेची दमदार कामगिरी महिनाभरात शोधला 17 लाख 50, 000/ हजारांचा मुद्देमाल पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडून विशेष कौतुक

 



सोलापूर (प्रतिनिधी ) शहरातून चोरीला गेलेला जून महिन्यात ५० लाख रुपयांचा आणि जुलैमध्ये ४७ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल सोलापूर शहर गुन्हे शाखेने चोरट्यांकडून हस्तगत केला आहे. यात शहर गुन्हे शाखेच्या पथकांनी जूनमध्ये २३ लाख ४५ हजारांचा आणि जुलैमध्ये पावणेअठरा लाख रुपयांचा ऐवज परत मिळवून संबंधितांना परत केला आहे.


शहर पोलिस आयुक्त एम. राज कुमार उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त दिलीप पवार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखालील त्यांच्या पथकांनी चोरट्यांना काही दिवसांतच शोधून काढले. सहायक पोलिस निरीक्षक शंकर धायगुडे, शैलेश खेडकर भरत चंदनशिव निलेश सोनवणे दत्तात्रय काळे, पोलिस उपनिरीक्षक विजय बनसुडे मनोज मोरे यांच्या नेतृत्वातील पथकांची कामगिरी नेहमीच उल्लेखनीय ठरली आहे. स्थानिक


पोलिसांनाही यांच्या नेतृत्वातील पथकांची नेहमीच मदत होते. दरम्यान, गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची जबाबदारी सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम घाडगे यांच्यावर आहे.



दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत पोलिस आयुक्तांनी या सर्व अधिकाऱ्यांसह तपास पथकाला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. यावेळी पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर वृष्टी जैन, डॉ. अश्विनी पाटील उपस्थित होते.

उघडकीस आणलेले गुन्हे

दुचाकी चोरी : २३

मोबाईल चोरी : ५

जबरी चोरी : १

इतर चोरी : ३

हस्तगत मुद्देमाल :

१७,६४,१८४ रूपये.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.