Type Here to Get Search Results !

कोल्हापूरच्या मैदानात डांगेंचा डंका मंद्रूपचे उपनिरीक्षक राज डांगे ठरले परिक्षेत्राचे स्टार कर्तव्यासोबत कौशल्याचीही चुणूक; सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा उंचावला मान.

 



सोलापूर (प्रतिनिधी ) 

खाकी वर्दी म्हणजे फक्त कायदा आणि सुव्यवस्था नाही, तर त्यामागे असते अखंड मेहनत, शिस्त आणि जिद्द. हेच पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे 

सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील मंद्रूप पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक राज डांगे यांनी 

कोल्हापूर येथे नुकताच पार पडलेल्या परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात पोलीस उपनिरीक्षक राज डांगे यांनी आपल्या अफलातून कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तांत्रिक कसोट्यांपासून ते कर्तव्याशी निगडित स्पर्धांपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपली छाप पाडली आणि शेवटी मानाचे बक्षीस खेचून आणले 

प्रतिकूल परिस्थिती ताण-तणाव आणि 24 तास ड्युटी असूनही राज डांगे यांनी सरावात कसूर केली नाही. त्याच शिस्तीचे आणि परिश्रमाचे फळ म्हणून वरिष्ठांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले

या यशामागे 

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप, मंद्रूप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पटवारी

आणि सहायक पोलीस निरीक्षक देविदास कंरडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभल्याचे उपनिरीक्षक राज डांगे यांनी सांगितले.

उपनिरीक्षक राज डांगे यांच्या या यशामुळे केवळ मंद्रूप पोलीस ठाणेच नाही तर संपूर्ण *सोलापूर ग्रामीण पोलीस दल* अभिमानाने फुलून गेले आहे. सहकारी मित्र पत्रकार बांधव आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वर्दीतला माणूस फक्त बंदोबस्तच नाही सांभाळत, तर स्पर्धेतही बाजी मारू शकतो

 हे उपनिरीक्षक राज डांगे यांनी दाखवून दिले.

त्यांच्या या कामगिरीमुळे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नाव परिक्षेत्रात उज्ज्वल झाले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.