Type Here to Get Search Results !

पोलीस विभागाची बदनामी करणाऱ्याची गय केली जाणार नाही - पोलीस आयुक्त एम राजकुमार सलगरवस्ती पोलिस ठाण्याचे 'इन्स्पेक्शन'

 


सोलापूर (प्रतिनिधी 

सलगर वस्ती पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि चालक शिपाई या दोघांनी चोरट्यालाच एका गुन्ह्यात मदत केली. यात दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे इन्स्पेक्शन केले. यावेळी त्यांनी, 'पोलिस दलात भरती झाल्यापासून सेवानिवृत्त होईपर्यंत तुमच्या नावापुढे 'पोलिस' लागलेले असते. तुमच्या चुकीच्या कामामुळे तुमची वैयक्तिक नाही, तर पोलिस खात्याची बदनामी होते. त्यामुळे चुकीचे काम करू नका,' असा सल्ला सर्व अधिकारी व अंमलदारांना दिला.


सांगलीतील तरुणला स्वस्तात सोने देतो, असे सांगून आठ जणांनी २८ लाख रुपयांची फसवणूक केली होती. या गुन्ह्यात पोलिसांची गाडी वापरण्यात आली होती. काही पैशांसाठी सलगर वस्ती पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अतुल न्यामणे व चालक शिपाई आकाश राठोड यांनी चोरट्यांना मदत केली होती. त्यानंतर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी सलगर पोलिस ठाण्यातील सर्व नोंदवह्यांची पडताळणी केली चार दिवसांच्या इन्स्पेक्शननंतर मंगळवारी (ता. २८) पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्याला भेट दिली. यावेळी पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर 

सहाय्यक पोलिस आयुक्त विजय कुर्री यांचीही उपस्थिती होती. काही दिवसांपूर्वीच या पोलिस ठाण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

यावेळी पोलीस दलाची बदनामी होईल असे कोणतेही काम करू नका असा सल्ला पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पोलीस अधिकारी अंमलदार यांना दिला असून पोलीस विभागाची बदनामी करणाऱ्याची गय केली जाणार नाही असा इशारा देखील दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.