Type Here to Get Search Results !

पार्क चौक ते जिल्हा परिषद एकेरी वाहतूक करा, पोलीस मित्र सोशल फौंडेशन चे पोलीस आयुक्त यांना निवेदन.




सोलापूर (प्रतिनिधी ) पार्क चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून आंदोलन गेट कडे येत असताना श्री सिद्धरामेश्वर मंदिर शाहजहूरवली दर्गा सिद्धेश्वर प्रशाला तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया ब्रह्मदेव माने दादा सहकारी बँक व पुनम गेट तसेच टायपिंग करणारे अनेक दुकाने आहेत या भागात नेहमीच आंदोलन उपोषण मोर्चा निदर्शने  होत असल्याने या परिसरात नेहमीच गर्दी आणि वर्दळ असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होते त्याच बरोबर जिल्हा परिषद व इतर शासकीय कार्यालयात जाताना येताना सर्वसामान्य माणसाला व अधिकारी कर्मचाऱ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे महिला व नागरिकांना या भागातून वाहन चालवताना बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागत आहे या भागात बरीच गर्दी असल्याने छोटे-मोठे अपघात नेहमीच होत असतात पार्क चौक ते जिल्हा परिषद (पूनम गेट ) हा परिसर एकेरी वाहतूक केल्यास त्या भागातील वर्दळ गर्दी तसेच वाहतुकीचीची कोंडी होणार नाही तसेच सभा मोर्चा आंदोलन निदर्शने करणाऱ्या व्यक्तीना वाहतुकीचा त्रास होणार नाही




 त्याच बरोबर जिल्हा परिषद व इतर कार्यालयात जाणाऱ्या अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांना या भागातून जाताना येताना अडचणीचा सामना करावा लागणार नाही 

अशी विनंती पोलीस मित्र सोशल फौंडेशन वतीने सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे 

यावेळी संस्थापक यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे शहर अध्यक्ष अंबादास गज्जम सचिव गणेश निंबाळकर सारा न्यूज चे संपादक डॉ राम हुंडारे अमोल कुलकर्णी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.