सोलापूर (प्रतिनिधी )
कारगिल विजय दिवसाच्या २७व्या वर्धापन दिनानिमित्त यश सिद्धी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य (महार रेजिमेंटची रजिस्टर संघटना), शाखा सोलापूर तसेच शाक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्था, सोलापूर (पोलीस अधिकारी व अंमलदारांची संस्था) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार्क चौक येथील चार हुतात्मा स्मारक येथे कारगिल शहीदांना शिस्तबद्ध लष्करी पद्धतीने मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस तिरंगा ध्वज फडकावून राष्ट्रगीताच्या सन्मानाने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. त्यानंतर चार हुतात्म्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास वीरपत्नींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यानंतर २६ जुलै १९९९ रोजी कारगिलच्या रणभूमीवर मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांना पुष्पचक्र अर्पण करून बिगुलच्या निनादात लष्करी मानवंदना देण्यात आली. यावेळी महार रेजिमेंटच्या परंपरेनुसार महारगान सादर करण्यात आले आणि राष्ट्रसेवेची शपथ व शौर्याची प्रेरणा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
परेडचे नेतृत्व राज्य उपाध्यक्ष माजी सैनिक शिवपुत्र घटकांबळे यांनी केले. कार्यक्रमास फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक महादेव राऊत, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे, यश सिद्धी संस्थेचे जिल्हाध्यक्ष कॅप्टन कमलाकर कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड, तिरुपती परकीपंडला, अशोक आगवणे, टिप्पणा लोहार, अंकुश बनसोडे, प्रा. सिद्धार्थ जाधव, श्रीशैल शिवशरण, बौद्धाचार्य अशोक वाघमारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, वीरनारी, माजी सैनिक, सैनिक परिवार, महिला-पुरुष नागरिक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी सैनिक जयानंद कांबळे, भाऊसाहेब वंजारे, विष्णू वाघमारे, सूर्यकांत गजघाटे यांच्यासह अन्य माजी सैनिकांनी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी आयु. कमलाकर कांबळे (जिल्हाध्यक्ष), आयु. जयानंद कांबळे (जिल्हा उपाध्यक्ष), आयु. बाबुराव बेलभंडारे (कोषाध्यक्ष), आयु. सूर्यकांत गजघाटे (संघटक), आयु. मल्लिकार्जुन धसाडे, आयु. शंभूदेव सूर्यवंशी, आयु. विष्णू वाघमारे, आयु. गुंडू केंगार, आयु. भाऊसाहेब वंजारे, श्रीशैल शिवशरण, आयु. चंद्रकांत बनसोडे, आयु. शिंदे साहेब, आयु. मारुती मोरे, सुरेश खलसोडे, माने सर, कांबळे सर, बनसोडे सर, प्रकाश घटकांबळे, लिंबाजी कांबळे, मसना मनोरे, गणपती आईवळे यांच्यासह माजी सैनिक व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूर शाखेचे उपाध्यक्ष सुभेदार जयानंद कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाक्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सोलापूरचे अध्यक्ष डॉ. अंगद मुके यांनी केले.
