Type Here to Get Search Results !

श्री वटवृक्ष मंदिरात श्रद्धेय भक्ती भावाने गुरुपौर्णिमा साजरी. भाविकांच्या गर्दीमुळे रात्री २ वाजता उघडण्यात आले मंदीर. गुरूंचे गुरू सद्गुरु श्री स्वामी समर्थांच्या चरणी हजारो भाविक

 



अक्कलकोट (प्रतिनिधी ) येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात श्री गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात आला.दत्त अवतारी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे गुरूंचे गुरु, सदगुरुंचे गुरु, त्रैलोक्याचे नाथ, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची महिमा आणि श्री स्वामी समर्थांचे मुळस्थान म्हणजे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान होय. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंचे पूजनीय दिवस अशा या पूजनीय दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमेदिवशी स्वामी दर्शनास भाविक विशेष महत्व देतात. आज दिवसभरात असंख्य भाविकांनी या पावन दिवशी स्वामींचे दर्शन घेऊन कृतार्थ झाले. पहाटे ४ वाजता समितीचे चेअरमन महेश इंगळे व भाविकांच्या उपस्थितीत मंदिराचे पुरोहित मोहनराव पुजारी यांच्या अधिपत्त्याखाली मंदार महाराज पुजारी व व्यंकटेश पुजारी यांनी श्रींची काकड आरती केली. तत्पूर्वी भाविकांच्या गर्दीमुळे रात्री २ वाजता मंदिर भाविकांना दर्शनाकरिता खुले करण्यात आले होते. स्वामी भक्तांच्या दर्शन रांगेची सोय मंदिराच्या दक्षिण महाद्वार परिसरातील शेडमध्ये बॅरेकेटींग करून करण्यात आली होती. सकाळी ११ वाजता श्रींची महानैवेद्य आरती पुरोहित मंदार महाराज यांच्या हस्ते व समितीचे चेअरमन महेश इंगळे, पोलिस अधीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. तदनंतर सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या वतीने शीरा प्रसाद वाटप करण्यात आले. स्वामी भक्तांच्या झालेल्या गर्दीमुळे मंदीरातील पुरुष व महिला भाविकांना वेगवेगळ्या स्वतंत्र दर्शन रांगेतून आरतीनंतर टप्या टफ्याने दर्शनास सोडण्यात येत होते. पुरुष व महिला भक्तांची स्वतंत्र दर्शन रांग, पोलीस बंदोबस्त, वाहतुक पोलीस बंदोबस्त, बॅरेकेटींग दर्शन रांग, दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची सोय, प्रथमोपचार केंद्र, वैद्यकीय सेवा, व्हीलचेअर इत्यादी सुविधांच्या माध्यमातून सुलभ स्वामी दर्शनाचा लाभ घेता आल्याने भाविकांच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह ओसंडून वाहत होता. गुरुपौर्णिमेनिमीत्त मैंदर्गी गाणगापूर रोडवरील भक्त निवास येथे भोजन महाप्रसादाचे आयोजन सालाबादा प्रमाणे देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले होते. अनेक स्वामी भक्तांनी या भोजन महाप्रसादाचा लाभ घेतला. गुरूपौर्णिमेनिमीत्त आज श्रींच्या नैवेद्य आरतीस उपस्थित राहून विद्यमान आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी 



मा.आमदार सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस अधिक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, उद्योजक राणा सुर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक अविनाश पवार, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, उद्योजक स्वामीभक्त अजीत सामंत, प्रशांत जोशी, देवदत्त गौडा आदी मान्यवरांसह अनेक स्वामी भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीश पवार, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी, श्रीशैल गवंडी, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, अमर पाटील, संतोष पराणे, महेश मस्कले, रमेश शिंदे, सागर गोंडाळ, लखन सुरवसे, आकाश चुंगीकर आदीसह देवस्थानचे कर्मचारी व सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.