सोलापूर (प्रतिनिधी ) शहर पोलीस दलातील क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) मध्ये कार्यरत असलेल्या वैभव बोराडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे सोलापूर शहर पोलीस दलासह संपूर्ण शहराचा मान उंचावला आहे.
जानकर नगर, लक्ष्मी पेठ (सोलापूर) येथील रहिवासी असलेल्या बोराडे सध्या सोलापूर शहर पोलीस दलात कर्तव्य बजावत आहेत. कठीण व जबाबदारीच्या 12 तासांच्या ड्युटीनंतरही त्यांनी रोज सुमारे सहा तास अभ्यासासाठी वेळ काढत सातत्य राखले. बंदोबस्ताच्या कामात व्यस्त असतानाही त्यांनी अभ्यासात कुठेही तडजोड न करता नियोजनबद्ध तयारी केली.
अभ्यास करताना त्यांनी MPSC च्या प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण केले आणि ‘रिव्हिजन’वर विशेष भर दिला. याच सातत्यपूर्ण मेहनतीचे फळ म्हणून त्यांनी राज्यात अव्वल क्रमांक मिळवला. “वडील महानगरपालिकेत स्वच्छता कामगार म्हणून कार्यरत होते
PSI परीक्षा राज्यातील अत्यंत स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक मानली जाते. अशा परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणे म्हणजे चिकाटी, शिस्त आणि योग्य नियोजन यांचे उत्तम उदाहरण मानले जाते. नोकरी सांभाळत, वेळेचे अचूक व्यवस्थापन करत वैभव बोराडे यांनी अनेक अडचणींवर मात केली.
या यशाबद्दल पोलीस
मित्र सोशल फौंडेशन वतीने सोलापूर येथील शासकीय विश्रामग्रह येथे त्यांचा शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
यावेळी संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू संघटक कलीम शेख उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे सोलापूर शहर अध्यक्ष अंबादास गज्जम कार्याध्यक्ष रशीद शेख सचिव गणेश निंबाळकर उपाध्यक्ष रमेश दग्गारी संघटक अतुल भडंगे प्रसिद्धी प्रमुख सिद्धाराम हमाले प्रसाद जगताप अमोल कुलकर्णी अरुण सिडगिद्दी उपस्थित होते.

