Type Here to Get Search Results !

आईस्क्रीमचे आमिष दाखवून चिमुकलीच्या पायातील ५ तोळ्यांचे चांदीचे पैंजण लंपास; २४ तासांत आरोपी गजाआड. जोडभावी पेठ पोलिसांची दमदार कारवाई



सोलापूर (प्रतिनिधी ) शहरातील कन्ना चौक परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. श्री तोगटवीर मंगल कार्यालय परिसरात रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घराबाहेर खेळत असलेल्या ५ वर्षीय चिमुकलीला आईस्क्रीम खायला देण्याचे आमिष दाखवून तिच्या पायातील अंदाजे ५ तोळ्यांचे चांदीचे पैंजण अज्ञात व्यक्तीने चोरून नेले.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पालकांनी आपल्या लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस ठाणे डी.बी. पथकाने तातडीने तपास सुरू केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक पोलीस कर्मचारी स्वप्निल कसगावडे, दत्ता मोरे व पवार यांच्या पथकाने सापळा रचून अवघ्या २४ तासात आरोपीला अशोक चौक येथील श्री मार्कंडेय उद्यान परिसरातून अटक केली.

या प्रकरणाचा पुढील तपास जोडभावी पेठ पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.