सोलापूर (प्रतिनिधी ) शहरातील जुना विडी घरकुल नई जिंदगी परिसर, एमआयडीसी हद्दीतील सुनील नगर, विजय नगर, सिध्देश्वर नगर, विनायक नगर, शांती नगर, ताई चौक या ठिकाणी रुग्णाच्या जीवाशी खेळणारे बरेच बोगस डॉक्टर असून कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना देखील सोलापूर शहरातील या भागात कोणताही अनुभव नसलेले बोगस डॉक्टर बिनदीक्कीतपणे रुग्णावर उपचार करत असून या बोगस डॉक्टरमुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून चुकीच्या उपचारामुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे अश्या बोगस डॉक्टर चा वेळीच शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे गोरगरीबांना तज्ज्ञ डॉक्टरची फी परवडत नाही तसेच बोगस डॉक्टरांची वैद्यकीय उपचारासाठी फी देखील कमी असल्याने रुग्ण उपचारासाठी या बोगस डॉक्टरकडे जातात हा डॉक्टर बोगस असल्याचे रुग्णाला देखील समजत नाही. शिवाय रुग्ण देखील या बोगस डॉक्टर च्या वैद्यकीय शिक्षण व डिग्री बाबत अधिक चौकशी करत नाही त्यामुळे वर्षानुवर्षे सोलापूर शहरातील या भागात बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करत आहेत या परिसरात बोगस डॉक्टरांची डोकेदुखी अनेक वर्षापासून सुरु बोगस डॉक्टरमुक्त करण्यासाठी शहर आरोग्य अधिकारी (सोलापूर महानगर पालिका) कोणतेही प्रयत्न करत नसल्याचे दिसून येत नसल्याचा गंभीर आरोप करत पत्रकार यशवंत पवार यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील बोगस डॉक्टरांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी सोलापूर चे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे केली असून एमआयडीसी परिसर बोगस डॉक्टर मुक्त करण्याची विनंती लेखी पत्राद्वारे केली आहे.
